रोहे : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कोलाड येथील डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नुकतेच प्रा. डॉ. बी. के. सिनगारे यांच्या हस्ते विद्यार्थी हा केंद्र बिंदू मानून करिअर कट्टाचे उद्घाटन करण्यात आले.
संस्थेचे ट्रस्टी संदीप तटकरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर मुंडे, अजित तेलंगे, प्राचार्य विपूल मसाळ, प्रा. दिपाली भालेकर, करिअर कट्टाचे संयोजक प्रा. सूर्यकांत आमलपुरे यांच्यासह विद्यार्थी या वेळी उपस्थित होते.
प्रा. डॉ. बी. के. सिनगारे यांनी या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.