Breaking News

सर्पमित्रांनो सावधान! साप हाताळतानाचे फोटो, व्हिडिओ व्हायरल केल्यास गुन्हा

पुणे : प्रतिनिधी
सर्पमित्रांकडून नागरी वस्तीमधील साप पकडून त्यांना सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यात सोडले जाते, परंतु अनेकदा साप पकडण्यापूर्वी वनखात्याची परवानगी घेतली जात नाही. त्याचप्रमाणे साप हाताळतानाचे फोटो, व्हिडिओ व्हायरल केले जातात. त्यामुळे वन्यजीव कायद्याचे उल्लंघन होत असून, अशा सर्पमित्रांविरुद्ध गुन्हे दाखल होऊ शकतात, असा इशारा वनखात्याने दिला आहे.
काही हौशी सर्पमित्र सापाला पकडल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल करत असतात, मात्र आता असे करणे सर्पमित्रांना अडचणीत आणू शकते.  या संदर्भात वनखात्याचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर दीपक पवार म्हणाले, एखाद्या व्यक्तीने विनापरवाना सापांना हाताळणे अथवा त्यांचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करणे हा वन्यजीव संरक्षण कायदा 1972 आणि जैव विविधता कायदा 2002 अन्वये गुन्हा आहे. असे प्रकार घडल्याचे निदर्शनास आल्यास तीन वर्षे कैद किंवा 50 हजार रुपये दंड होऊ शकतो.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply