Breaking News

माणगाव तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी

बाधित रुग्णांची संख्या सातवर

माणगाव ः प्रतिनिधी – माणगाव तालुक्यातील इंदापूर येथील 50 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा शुक्रवारी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने तालुक्यात कोरोनाच्या पहिल्या बळीची नोंद प्रशासनाकडे करण्यात आली आहे. तसेच शनिवारी माणगावमध्ये एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला असून तालुक्यात सद्यस्थितीत सात कोरोनाबाधित रुग्ण असल्याची माहिती तहसीलदार प्रियंका आयरे-कांबळे यांनी दिली आहे.

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यापासून माणगाव तालुक्यात कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. तालुक्यातील जवळपास 24 गावांतून आजपर्यंत 54 जणांना कोरोनाची लागण होऊन त्यापैकी इंदापूर येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला. 46 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत, तर सात रुग्णांवर रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत. माणगाव तालुक्यात लॉकडाऊन शिथिल झाल्याने काही नागरिक बेशिस्त व निष्काळजीपणे वागताना दिसत आहेत. दुकाने, बँका, एटीएमसमोर मोठी गर्दी होताना दिसत आहे. कोरोना संसर्गजन्य विषाणू असल्याने सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. प्रशासन वेळोवेळी जनतेला सतर्क व जागरूक राहण्याच्या सूचना देत असून याकडे तालुक्यातील जनतेने गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन माणगाव तालुका लवकरात लवकर आपण सर्वांनी सांघिक प्रयत्नांतून कोरोनामुक्त करू या, असे आवाहन तहसीलदार प्रियंका आयरे-कांबळे यांनी केले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply