आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्याबद्दल महेश साळुंखे यांनी दिले धन्यवाद!

पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी कोरोनामुळे लागू लॉकडाऊनच्या काळात केलेल्या समाजसेवेबद्दल त्यांना स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी हार्दिक धन्यवाद दिले आहेत.

या संदर्भात जारी केलेल्या पत्रकात साळुंखे यांनी म्हटले आहे की, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आमदार प्रशांत ठाकूर यांनी कोणीही व्यक्ती उपाशी झोपू नये, राहू नये याकरिता योग्य ती खबरदारी घेतली. दररोज हजारो लोकांच्या भोजनाची त्यांनी व्यवस्था केली. त्यामुळे पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये कोणीही उपासमारीने दगावला नाही. त्याचप्रमाणे स्वतः जातीने लक्ष दिल्याने आरोग्यसुविधा या योग्य रितीने पुरविण्यात आल्या. पनवेल महापालिका हद्दीतील कोरोनाबाधितांचे प्रमाण थोपविण्याकरिता आमदार प्रशांत ठाकूर यांचा दूरदर्शीपणा, मेहनत व मार्गदर्शन कामी आले.

रायगड जिल्ह्यात नुकतेच चक्रीवादळ झाले. या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी संपूर्ण जिल्ह्याचा दौरा केला व नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. त्याचप्रमाणे गरजवंतांना भाजपच्या वतीने मदत दिली. याबद्दलही त्यांचे साळुंखे यांनी कौतुक केले आहे.

Check Also

Vor die eine Auszahlung denkbar sei, in kraft sein halb wahrscheinlich Umsatzbedingungen

Bares unter anderem Bonusgewinne In welchem ausma? diese Gewinne schenke & amyotrophic lateral sclerosis Bonusgeld …

Leave a Reply