उरण : वार्ताहर
उरण : वार्ताहर
रिमझिम पाऊस सुरु झाल्याने उरण बाजार पेठेत विविध रंगी छत्र्या, रेनकोट दाखल आले असून बाजारात खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. यंदाही पावसाचे प्रमाण जास्त असल्याने तसेच यंदाही सरासरी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने मार्केटमध्ये नवीन प्रकारच्या ब्रॅण्डेड छत्र्या दाखल झाल्या आहेत.
महिन्याच्या सुरुवातीस वरुणराजाने हजेरी लावल्याने रेनकोट, छत्र्या, पावसाळी टोप्या, ताडपत्री, प्लास्टिक पेपर आणि अन्य साहित्य घेण्यासाठी नागरिकांची काही प्रमाणांत लगबग सुरु झाली आहे. मार्केटमध्ये नवीन प्रकारच्या नायलॉन कापडाच्या छत्र्या दाखल झाल्या आहेत. तीन घडी, करून लहान आकारात होणार्या छत्र्या देखील ग्राहकांना आकर्षित करीत आहेत.
लहानमुलांसाठीही छोट्या छत्र्या आहेत. तसेच महिलांसाठी रंगी बेरंगी आणि बालकांच्या कार्टूनच्या चित्रांनी सजविलेल्या छत्र्याआकर्षण लुक ग्राहकांचे लक्ष वेधून आहेत. यंदा नायलॉन कापडाच्या सर्व ब्रॅन्डेड छत्र्या आल्या असून रंगीत व विविध आकाराच्या छत्र्या आल्या असून नायलॉन कपडापासून बनविलेल्या छत्र्यांना मागणी खूप आहे. 200 ते 700 रुपयांपर्यंत किंमतीच्या छत्र्या उपलब्ध आहेत, असे मंगल जनरल स्टोअर्सचे ताराचंद जैन यांनी सांगितले.
रिमझिम पाऊस सुरु झाल्याने उरण बाजार पेठेत विविध रंगी छत्री, रेनकोट दाखल आले असून बाजारात खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. यंदाही पावसाचे प्रमाण जास्त असल्याने तसेच यंदाही सरासरी पाऊस पडण्याचे अंदाज वर्तविण्यात आल्याने मार्केटमध्ये नवीन प्रकारच्या ब्रॅन्डेड छत्र्या दाखल झाल्या आहेत.
महिन्याच्या सुरुवातीस वरूनराजाने हजेरी लावल्याने रेनकोट, छत्र्या, पावसाळी टोप्या, ताडपत्री, प्लास्टिक पेपर आणि अन्य साहित्य घेण्यासठी नागरिकांची काही प्रमाणांत लगबग सुरु झाली आहे. मार्केटमध्ये नवीन प्रकारच्या नायलॉन कापडाच्या छत्र्या दाखल झाल्या आहेत. तीन घडी, करून लहान आकारात होणार्या छत्र्या देखील ग्राहकांना आकर्षित करीत आहेत.