पनवेल : बातमीदार
पनवेल तालुक्यातील आजिवली, देवद, नेरे, पारगाव येथे कोरोना विषाणू बाधित व्यक्ती आढळून आल्याने हा परिसर कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
या परिसरात राहणार्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणार्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.
नवी मुंबईत 124 जण पॉझिटिव्ह; नऊ जणांचा बळी
नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबईत शुक्रवारी (दि. 19) कोरोनाचे 124 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर तब्बल एकाच दिवसात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नवी मुंबईत रुग्णांची संख्या चार हजार 515 झाली आहे. तर मृतांची एकूण संख्या 147 झाली आहे. 84 रुग्ण बरे झाले आहेत.
सध्या नवी मुंबईतील पालिका तसेच विविध खासगी रुग्णालयांत सद्यस्थितीत एक हजार 765 रुग्ण उपचार घेत आहेत. नवी मुंबईतील कोरोनामुक्त होणार्यांची शुक्रवारी घरसरलेली आकडेवारी एक टक्क्याने वाढून ती 58 टक्के झाली आहे. शुक्रवारीची बाधितांची विभागवार आकडेवारी पाहिल्यास बेलापूर 4, नेरुळ 18, वाशी 8, तुर्भे 13, कोपरखैरणे 44, घणसोली 10, ऐरोली 20, दिघा 7 असा विभागवार रुग्णांचा समावेश आहे.