Breaking News

पनवेल तालुक्यात कोरोनाचे 85 नवीन रुग्ण

दोघांचा मृत्यू; 37 रुग्णांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 19) कोरोनाचे 85 नवीन रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 37 रुग्णांनी  कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत 65 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर 32 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 20 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून  पाच रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

पनवेल महापालिकाक्षेत्रात शुक्रवारी 65 नवीन रुग्ण सापडल्यामुळे पनवेल मधील रुग्णाची संख्या 1194 झाली आहे. कळंबोली खेडूकपाडा येथील 25 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पनवेल शहरात 27 रुग्ण सापडल्याने नागरिकात घबराट पसरली आहे शिवाजीनगर झोपडपट्टीतील एकाच कुटुंबात नऊ व्यक्तींना तर नवनाथ नगरमधील दोन व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. नवीन पनवेल मध्ये सात नवीन रुग्ण सापडले आहेत. यामध्ये पंचशील नगर, सेक्टर 7 मधील आदर्श सोसायटी आणि खांदा कॉलनीतील व्यक्तींचा समावेश आहे. तळोजा येथे दोन नवीन रुग्ण सापडले असून डोंगरी पाडा आणि पाचनंद रोहिंजण येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. कळंबोली येथे नऊ नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये सेक्टर 11, सेक्टर 5 आणि 3 मधील एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींचा समावेश आहे. कामोठेमध्ये आठ रुग्ण आढळले आहेत. सेक्टर 18 जेजे स्मृति मधील एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींचा समावेश आहे. खारघरमध्ये 12 नवीन रुग्ण आढळले असून सेक्टर 15 प्रजापती मधील एकाच कुटुंबातील तीन, सेक्टर 13 हावरे टायरा कॉम्प्लेक्समधील एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींचा समावेश आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 1194 रुग्ण झाले असून 812  रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 68.01  टक्के आहे. 329 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. शुक्रवारपर्यंत 53 जणांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल ग्रामीणमध्ये 20 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून त्यामध्ये  आदई, शिरढोण, ओवळे, विचुंबे, खेरणे, केळवणे, कोप्रोली येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. तरे उलवे येथे पाच, करंजाडे येथे दोन, आकूर्ली येथे दोनव नेवाली येथे तीन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच उसरली खुर्द एक, नांदगाव दोन, विचुंबे तीन येथील कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आदई येथील 68 वर्षीय एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे.  पनवेल ग्रामीणमध्ये आता पर्यंत 251 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply