अलिबाग ः प्रतिनिधी
सीमेवरील चीनच्या कुरापतींमुळे देशात संतापाचे वातावरण पसरले आहे. वेगवेगळ्या मार्गांनी चीनच्या भूमिकेचा निषेध केला जात आहे. त्या अनुषंगाने अलिबागेतील चेंढरे येथे नागरिकांनी एकत्र येत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. या वेळी नागरिकांच्या हातात चीनविरोधातील घोषणांचे फलक होते, तसेच भारतमाता की जय आणि चीनविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सर्व जण मास्क वापरत तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळत या आंदोलनात सहभागी झाले होते.