Breaking News

खोपोलीत योग दिन उत्साहात

खोपोली ः प्रतिनिधी – जागतिक योग दिनानिमित्त रविवारी खोपोलीत विविध बंदिस्त सभागृहांत प्रस्तावित योगगुरूंनी योगाचे धडे दिले. दरम्यान, कोरोनाचे संकट पाहता सर्वसामान्य नागरिकांनी मात्र आपापल्या इमारती व घरांतच योगसाधना करून नियमितपणे योगाभ्यास करण्याचा संकल्प केला.

वर्तमान स्थितीत कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असताना अशा स्थितीत कोरोनाला रोखण्यासाठी व शारीरिक, मानसिक स्वास्थ्य सुदृढ ठेवण्यासाठी नियमितपणे योगाभ्यास फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकही मोठ्या संख्येने योगाभ्यासाचे धडे घेण्यास इच्छुक आहेत. त्या अनुषंगाने रविवारी जागतिक योग दिनानिमित्त खोपोली शहरात घराघरांत व इमारतींच्या छतांवर रहिवाशांनी योगाभ्यासाचे धडे घेऊन नियमितपणे योग करण्याचा संकल्प केला.

Check Also

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भव्य मूट कोर्टचे बुधवारी उद्घाटन

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोहळा पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक …

Leave a Reply