Breaking News

देवेंद्र फडणवीसांचा आज आठ लाख भाजप कार्यकर्त्यांशी ऑनलाइन संवाद; सेवा समर्पण अभियानानिमित्त होणार कार्यक्रम

मुंबई : प्रतिनिधी

माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी (दि. 7) भारतीय जनता पक्षाच्या राज्यभरातील शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख व बूथ समिती सदस्य म्हणून काम करणार्‍या सुमारे आठ लाख कार्यकर्त्यांशी ऑनलाइन संवाद साधणार आहेत. भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. उपाध्ये यांनी पत्रकात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक रचना अधिक बळकट करण्याचा संकल्प केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यभरातील बूथ समित्यांची, शक्ती केंद्रांची रचना पूर्ण केली जात आहे. भारतीय जनता पक्षातर्फे सध्या समर्थ बूथ अभियान व सेवा-समर्पण अभियानानिमित्त राज्यभर वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस हे शक्ती केंद्र व बूथ समिती प्रमुख तसेच बूथ समिती सदस्य म्हणून कार्यरत असणार्‍या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. पक्षाच्या संघटनात्मक कार्यक्रमांचा आढावाही देवेंद्र फडणवीस या वेळी घेणार आहेत. एखाद्या राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्याने एकाच वेळी आठ लाख कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा विक्रम या संवादाच्या माध्यमातून प्रस्थापित होणार आहे, असे उपाध्ये यांनी पत्रकात नमूद केले आहे.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply