Breaking News

विजेच्या धक्क्याने पाच म्हशी मृत्युमुखी

अलिबाग ः प्रतिनिधी तालुक्यातील आवास येथे शनिवारी सायंकाळी विजेच्या धक्क्याने पाच म्हशींचा जागीच मृत्यू झाला. यात म्हशींचे मालक अशोक भगत यांचे सव्वातीन लाख रुपयांचे नुकसान झाले. भगत यांच्या काही म्हशी चरण्यासाठी आवास ते किहीमदरम्यानच्या जंगलात गेल्या होत्या. चक्रीवादळामुळे अलिबाग तालुक्यात वीजवाहक तारा तुटून पडल्या आहेत. त्यांची जोडणी करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. त्यातील लोंबकळणार्‍या जिवंत वीजवाहिनीचा स्पर्श झाल्याने पाच म्हशी मृत्युमुखी पडल्या. या घटनेचा पंचनामा करून त्याची नोंद मांडवा सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Check Also

छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीची बैठक

शिवसृष्टीच्या उभारणी कामाला लवकरच होणार सुरुवात पनवेल ः रामप्रहर वृत्तमुंबईतील शिवाजी पार्कच्या धर्तीवर उलवे नोडमध्ये …

Leave a Reply