अंजुमन महाविद्यालयाचा उपक्रम
मुरूड : प्रतिनिधी
अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स आणि माजी नगराध्यक्ष रहीम कबले यांच्या संयुक्त विद्यमाने मुरूड नगर परिषदेतील सर्व कर्मचार्यांना रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी होमियोपॅथिक गोळ्यांचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले
मुरूड नगर परिषद कोरोनापासून शहरी नागरिकांचा बचाव व संरक्षण होण्यासाठी उपाययोजना करीत आहे, परंतु सफाई कर्मचारी व विविध अधिकारी सातत्याने जनसंपर्कात असतात. अशा वेळी त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्सच्या वतीने सामाजिक जाणिवेतून प्राचार्य डॉ. शरद फुलारी यांच्या संकल्पनेतून गोळ्या वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी नगर परिषदेतील सर्व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी सुमारे तीनशेपेक्षा जास्त बॉटल्सचे माजी नगराध्यक्ष रहीम कबले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. मुख्याधिकारी अमित पंडित यांनी कौतुक केले.