Breaking News

मतदारराजा जागा झाला हो… पनवेल, उरण परिसरात मतदानाला उदंड प्रतिसाद; नवमतदारही सहभागी

पनवेल : गेले महिनाभर सुरू असलेल्या लोकशाही उत्सवाचा सोमवारी (दि. 29) मतदानाने शेवट झाला. मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल विधानसभा मतदारसंघात चुरशीचे मतदान झाले. मतदान करण्यासाठी मतदारांनी सर्वच मतदान केंद्रांवर सकाळच्या सत्रात मोठी गर्दी केली होती. नवमतदारांपासून आजी-आजोबापासून सार्‍यांनीच हक्काने मतदान करीत आम्ही भारताचे सच्चे नागरिक असल्याचे दाखवून दिले. मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रशासनानेही मतदान केंद्रांवर अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. पनवेलमधील व्ही. के. हायस्कूलमधील एका मतदान केंद्रावर आकर्षक पद्धतीने सजावट केल्याने मतदारांची मोठी गर्दी झाली होती. मी मतदान केले, तुमचे काय, असा सवाल विचारत अनेक जण या मतदान केंद्रावर सेल्फी काढताना दिसत होते. फुग्यांच्या आकर्षक सजावटीने पालकांसमवेत आलेल्या बच्चेकंपनीला या मतदान केंद्राची भुरळ पडली. एकूणच रणरणत्या उन्हातही मतदारांनी स्वयंस्फूर्तीने मतदानात सहभाग नोंदवत लोकशाही आणखी सुदृढ करण्याचा निर्धार केला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply