Breaking News

दीपक मोकल यांची नियुक्ती

रेवदंडा ः प्रतिनिधी

को. ए. सो. चे माजी मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक दीपक मोकल यांची व्हॉलीबॉल असोसिएशन इंडियाच्या उपाध्यक्षपदी आणि महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. धुळे येथील पिंपळनेरमध्ये 19 जूनला व्हॉलीबॉल असोसिएशनच्या कार्यकारी  मंडळाची सभा झाली. या सभेत आमदार मंजुळा गावित, माजी खासदार डॉ. राजेंद्र गावित,  महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्राध्यापक डी. बी. साळुंके आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू अंकुश पाठक यांच्या उपस्थितीत दीपक मोकल यांची महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन सचिवपदी नियुक्ती करण्यात आली, तर व्हॉलीबॉल असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष विपीनकुमार आणि एज्युकेटिव्ह सेक्रेटरी विक्रमसिंग यांनी मोकल यांची व्हॉलीबॉल असोसिएशन इंडियाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली. डी. बी. साळुंके यांचीदेखील उपाध्यक्षपदी, तर सहकार्यवाहपदी अंकुश पाठक यांची निवड करण्यात आली. या नियुक्तीबद्दल रायगड जिल्ह्यातील खेळाडू, हितचिंतक, बेनवले तसेच चौल-रेवदंडा परिसरातील ग्रामस्थांनी दीपक मोकल यांचे अभिनंदन केले.

शिष्यवृत्तीकरिता विद्यार्थ्यांना आवाहन

अलिबाग : प्रतिनिधी

राज्यातील अनुसूचित जमातीच्या 10 विद्यार्थ्यांना परदेशात पदवी अथवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी राज्य शासनामार्फत शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यानुसार अर्ज मागविण्यात आले आहेत. शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी विहित नमुन्यातील आवेदनपत्र प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण, जि. रायगड यांच्या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. परिपूर्ण माहिती भरून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज 3 जुलैपर्यंत सादर करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे पेण येथील अधिकारी के. बी. खेडकर यांनी केले आहे.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply