Breaking News

सिडकोच्या घरांचे हफ्ते भरण्यास मुदतवाढ

आमदार गणेश नाईक यांच्या पाठपुराव्याला यश

नवी मुंबई : बातमीदार

सिडकोच्या महानिर्माण गृहयोजनेतील हजारो लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून  आ. गणेश नाईक यांनी राज्य शासनाकडे मागणी केल्यानुसार त्यांना घरांचे हफ्ते भरण्यास तीन महिन्यांची वाढीव मुदत राज्य शासनाकडून देण्यात आली आहे. त्यानुसार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडको लाभार्थ्यांना दिलासा देत तीन महिन्यांची आणखी वाढीव मुदत दिली आहे. त्याचा लाभ हजारो कुटुंबियांना मिळणार आहे.

अल्प आणि आर्थिकदृष्टया घटकांकरिता सिडको घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी या भागात 14 हजार 838 घरे बांधत आहे. 2 ऑक्टोबर 2018 रोजी या घरांसाठी सोडत काढण्यात आली होती. या घरांची खरेदी किंमत भरण्यासाठी सिडकोने लाभार्थ्यांना हफ्ते आखून दिले आहेत. हे हफ्ते भरण्याची अंतिम मुदत 30 जुन 2020 अशी आहे. मात्र कोरोना महामारीमुळे मागील दोन ते अडीच महिने लॉकडाउन सुरु होता. या काळात लाभार्थ्यांनी गृह कर्जासाठी बँकांकडे केलेल्या अर्जांंची प्रक्रीया पूर्ण झाली नाही. त्यामुळे त्यांना कर्ज मिळालेले नाही. अनेकांच्या नोकर्या आणि रोजगार गेले आहेत. अनेकांच्या वेतनात कपात झाली आहे. अशा बिकट परिस्थितीत या सर्वांना दिलेल्या मुदतीत हफ्ते भरणे शक्य नाही. मुदतीत हफ्ते न भरल्याने मिळालेले हक्काचे घर हातून जाण्याची भिती या लाभार्थ्यांमध्ये दाटली आहे. लाभार्थ्यांची ही अडचण लक्षात घेवून आमदार गणेश नाईक यांनी 10 जुन 2020 रोजीच राज्याचे मुख्यमंत्री, नगरविकासमंत्री, नगरविकास राज्यमंत्री, सिडकोचे व्यवस्थापकीय-संचालक या सर्वांना पत्र पाठवून  किमान सहा महिने तरी हफ्ते भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. तसेच ही मुदतवाढ देताना कोणत्याही प्रकारची दंडवसूली करु नये, अशी मागणीही शासनाकडे केली होती. याबाबत बुधवारी राज्य सरकारने निर्णय घेतला असून हफ्ते भरण्यासाठी तीन महिने मुदतवाढ दिली आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply