Tuesday , February 7 2023

गावांतच रहा! गावाकडे चला!!

पालकमंत्री रवींद्र रव्हाण यांची युवकांना साद; विकासकामांची आढावा बैठक

श्रीवर्धन : प्रतिनिधी

भाजपप्रणित केंद्र व राज्य सरकार सर्वसामान्य माणसाच्या हिताचे असून, जनहिताची कामे गतीमान आणि प्रामाणिकपणे  करीत आहे. शासकिय योजनांचा लाभ  तळागाळातील लोकांपर्यंत पोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे. जिल्ह्यातील युवकांनीही गावांतच रहा! गावाकडे चला!! या संकल्पनेला अनुसरून स्थलांतरित न होता आपल्याइथेच छोटे-मोठे उद्योग, व्यवसाय करून उत्कर्ष साधावा, असे आवाहन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी (14 फेब्रुवारी) श्रीवर्धन येथे केले.

श्रीवर्धन तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेण्याकरिता गुरुवारी येथील कुणबी समाज मंदिराच्या ग. स. कातकर सभागृहात भाजप कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. भाजपचे जिल्हा विस्तारक अविनाश कोळी, जिल्हा उपाध्यक्ष तथा श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष कृष्णा कोबनाक, तालुका अध्यक्ष प्रशांत शिंदे, सरचिटणीस आशुतोष पाटील, मंगेश शिगवण, शहर अध्यक्ष शैलश खापणकर, मनोज गोगटे, जयदीप तांबुटकर, महिला मोर्चा अध्यक्षा आरती मांजरेकर, मनीषा श्रीवर्धनकर, गजानन निंबरे यांच्यासह तालुका व मंडळ पदाधिकारी, बुथ अध्यक्ष, बुथ समिती कार्यकर्ते, श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील भाजप कार्यकर्ते व नागरिक यावेळी मोठ्या संख्येन उपस्थित होते. याबैठकीत पालकमंत्री चव्हाण उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. राज्य व केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे देश प्रगतीच्या दिशेने गरूड झेप घेत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. 

सर्वाधिक पाऊस पडूनही, रायगड जिल्ह्यातील अनेक गावांना दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवते. भाजप सरकारने राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून सपुंर्ण रायगड जिल्ह्यासाठी पाणी पुरवठा कृती आराखडा तयार केला असून, पाणीटंचाई भासणार्‍या  प्रत्येक गावाचा या कृती आराखड्यामध्ये सामावेश करण्यात आला असल्याचे ना. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

रायगड जिल्हातील श्रीवर्धन तालुक्यामध्ये विकास कामासाठी सर्वात जास्त निधी देण्याचे काम आम्ही केले आहे, असे सांगून पालकमंत्र्यांनी गेल्या साडेचार वर्षामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, पंतप्रधान ग्राम सडक योजना, घरकुल योजना, आदी विविध योजनांच्या माध्यमातून केलेल्या कामाचा आढावा यावेळी  घेतला. आणि भाजप सरकारची कामे जनतेपर्यंत पोचविण्याचा निर्धार कार्यकत्यार्ंनी करावा, असे आवाहन केले.

Check Also

नवी मुंबई ते मुंबई आता फक्त 50 मिनिटांत

बेलापूर-गेटवे वॉटर टॅक्सी सेवा सुरू नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया …

Leave a Reply