कर्जत : प्रतिनिधी
कर्जत तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना पसरला आहे. कोरोनाची साखळी तुटावी म्हणून कर्जतच्या व्यापारीवर्गाने सोमवार (दि. 29)पासून तीन दिवस कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला. कर्जत शहराबरोबरच कडाव आणि डिकसळसुद्धा बंद ठेवण्यात आले आहे.
एका उत्तरकार्यात उपस्थिती दर्शविल्यामुळे 21 जणांना कोरोनाची लागण झाली. दिवसागणिक ही संख्या वाढतच आहे. कर्जत शहराबरोबरच लगत असलेल्या गावांमध्येसुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. ही साखळी तोडण्यासाठी कर्जतच्या व्यापारीवर्गाने शहर तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी फेडरेशनच्या सभेमध्ये जाहीर केला. त्यानुसार सोमवारपासून कर्जत कडकडीत बंद आहे. याशिवाय कडावची बाजारपेठ आणि डिकसळच्या व्यापार्यांनीसुद्धा कर्जत बंदला पाठिंबा देत कडकडीत बंदमध्ये सहभाग घेतला. कधी नव्हे ते डी-मार्टसुद्धा बंद ठेवण्यात आले आहे.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …