Breaking News

वीज ग्राहकांना दिलासा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची ऊर्जामंत्र्यांकडे मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली आर्थिक मंदी लक्षात घेता महावितरणकडून करण्यात आलेली अंदाजित वाढीव वीज देयके तातडीने रद्द करून ग्राहकांनी वापरलेल्याच विजेची  देयके देण्यात यावी आणि ही वीज देयके भरण्यास मुदत देण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सद्यस्थितीत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये पनवेल तालुक्यातील अनेक छोटे-मोठे उद्योग बंद पडले आहेत. अशा परिस्थितीत रायगड जिल्ह्यात विशेषतः पनवेल तालुक्यात महावितरणने अंदाजित वाढीव वीज देयके ग्राहकांना आकारली आहेत. या लॉकडाऊनच्या कालावधीत बरेच उद्योगधंदे बंद पडल्याने अनेकांच्या नोकर्‍याही गेलेल्या आहेत, तर काहींना अतिशय अल्प वेतनात आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणेही कठीण होत आहे. उक्त परिस्थितीत उत्पन्नाचे स्त्रोत कमी झाल्यामुळे महावितरणने पाठविलेली वाढीव वीज देयके भरणे ग्राहकांना अशक्य होणार आहे व त्या अनुषंगाने या संदर्भात नागरिकांच्या अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत.

लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली आर्थिक मंदी लक्षात घेता महावितरणकडून देण्यात आलेली अंदाजित वाढीव वीज देयके तातडीने रद्द करून ग्राहकांना त्यांनी वापरलेल्याच विजेची देयके देण्यात यावी आणि वीज देयके भरण्यास मुदत देण्यात यावी, अशी मागणी करून वीज ग्राहकांच्या समस्येवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य शासनाचे लक्ष वेधले आहे.

Check Also

नमो चषक महोत्सवाचा शनिवारी पारितोषिक वितरण सोहळा

माजी क्रिकेटपटू तथा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त लोकप्रिय पंतप्रधान …

Leave a Reply