आमदार रविशेठ पाटील यांनी मांडली स्थानिकांची बाजू
पेण : प्रतिनिधी
पेण तालुक्यातील डोलवी येथील जेएसडब्ल्यू स्टील कंपनीच्या
मनमानी कारभाराविरोधात सोमवारी (दि. 5) स्थानिक पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कंपनीसमोर ठिय्या मांडून गेट बंद आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार रविशेठ पाटील यांनी केले.
या वेळी रविशेठ पाटील म्हणाले की, जेएसडब्ल्यू कंपनीने स्थानिकांच्या समस्या सोडविणे गरजेचे आहे. येथील तरुणांचा रोजगाराचा प्रश्न आजही प्रलंबित असून, या तरुणांना रोजगार द्यावा. प्रशासनविषयी असलेले सर्व प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावे, तसेच कंपनीमुळे होणार्या प्रदूषणविषयी समस्यांचेही निवारण करावे.
माजी सभापती संजय जांभळे, डोलवीचे सरपंच अनिल म्हात्रे, वडखळचे सरपंच राजेश मोकल, गडबचे सरपंच तुळशीदास कोठेकर यांनीही आंदोलनात सहभाग घेऊन कंपनीच्या मनमानी कारभाराचा पाढा वाचला.
या आंदोलनात स्थानिक प्रतिनिधी प्रभाकर म्हात्रे, संतोष पाटील, प्रकाश जांभळे, जे. बी. पाटील, एम. डी. पाटील, प्रमोद म्हात्रे, प्रशांत म्हात्रे, मधुकर म्हात्रे, गणेश म्हात्रे, प्रभाकर कोठेकर, अमृत म्हात्रे, निर्माण म्हात्रे आदीसह संघटनेचे पदाधिकारीही सहभागी झाले होते.