Monday , June 5 2023
Breaking News

‘तो’ व्हिडीओ बुमरावर झाला बुमरँग

मुंबई : प्रतिनिधी

गेल्या काही महिन्यांपासून आपल्या कृत्यांमुळे क्रिकेटपटूंवर टीका होताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांनी ‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमात अश्लील वक्तव्य केले. त्यामुळे ते दोघेही टीकेचे धनी ठरले होते. त्यांच्यानंतर आता वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे.

सध्या आयपीएलचा ज्वर असून, खेळाडू कसून सराव करीत आहेत. बुमरा हा आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या संघातील प्रमुख गोलंदाज आहे. बुमरा सराव करीत असताना त्याचा एक व्हिडीओ मुंबई इंडियन्सने शेअर केला आहे. त्यामुळेच बुमरावर बुमरँग झाल्याचे म्हटले जात आहे.

या व्हिडीओत बुमरा हॉटेलमध्ये आल्यापासूनचे फुटेज दाखवण्यात आले आहे. बुमरा हॉटेलबाहेर आपल्या गाडीतून उतरला तेव्हा तिथे असलेल्या गेटकिपरने त्याला नमस्कार केला. त्यानंतर त्या गेटकिपरने बुमराशी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला, मात्र त्या गेटकिपरकडे न पाहता बुमरा सरळ पुढे निघून गेल्याचे दिसून आले. या गोष्टीमुळे बुमरा ट्रोल होत असून, आजच्या क्रिकेटपटूंना माणुसकी नसल्याची टीका सध्या होत आहे.

Check Also

खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खारघर ः प्रतिनिधी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने माजी खासदार …

Leave a Reply