Breaking News

रायगडात 75 नवे कोरोना पॉझिटिव्ह

पनवेल ः रामप्रहर वृत्त

रायगड जिल्ह्यात दिवाळीनंतर वाढलेली कोरोना रुग्णांची संख्या आता पुन्हा घटू लागली असून, सोमवारी (दि. 7) नव्या 75 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात 109 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 37 व ग्रामीण 23) तालुक्यातील 60, पेण तालुक्यातील आठ, खालापूर, अलिबाग व सुधागड तालुक्यातील प्रत्येकी दोन आणि पोलादपूर तालुक्यातील एकाचा समावेश आहे. सुदैवाने सोमवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 57,925 झाला असून, मृतांची संख्या 1612 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 55,328 जण कोरोनामुक्त झाले असून, 985 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Check Also

शेल इंडिया मार्केट्स कंपनीच्या कामगारांना भरघोस वेतनवाढ

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करार पनवेल : रामप्रहर वृत्तशेल एम्प्लॉईज युनियनच्या मार्गदर्शनाखाली शेल …

Leave a Reply