Breaking News

कासाडी नदी प्रदूषणाची अधिकार्‍यांकडून पाहणी

कळंबोली : प्रतिनिधी

तळोजा औद्योगिक क्षेत्रातील कासाडी नदीत सोमवारी (दि. 29) पहाटे विघातक विषारी पाणी सोडल्याने कानपोली पुलाखाली पाण्याला लाल रंग आला होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याची दखल घेत प्रदूषण नियंत्रण महामंडळाने दुसर्‍याच दिवशी पाहणी केली, मात्र संबंधित रसायन हे कानपोली पुलाच्या खाली असल्याने ते क्षेत्र एमआयडीसी हद्दीत येत नसल्याचे या वेळी अधिकार्‍यांनी सांगितले. त्यामुळे आता कधी कारवाई होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. रसायनाचे नमुने घेतले आहेत. ते कोणत्या कंपनीने सोडले याची माहिती मिळवून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी कासाडी नदीत रसायन सोडले आहे तो भाग रायगड प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अखत्यारित येतो. त्यांना याबाबत कळविण्यात आले आहे, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी किशोर किल्लेकर यांनी या वेळी सांगितले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply