Breaking News

शिवसेनेचे रवींद्र कोळी, महेंद्र कोळी यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

उरण ः प्रतिनिधी

उरणचे आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून ग्रुप ग्रामपंचायत चाणजे शिवसेनेचे विद्यमान सदस्य रवींद्र कोळी व करंजा मच्छीमार सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन महेंद्र कोळी यांनी मंगळवारी

(दि. 30) भाजप कार्यालय उरण येथे आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत भाजपत जाहीर प्रवेश केला.आमदार महेश बालदी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी आमदार महेश बालदी, भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, उरण नगर परिषद उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप नेते प्रदीप नाखवा, चाणजे विभाग अध्यक्ष तथा माजी सरपंच जितेंद्र घरत, राजेश कोळी, विनोद कोळी, उरण शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील, तेजस पाटील, भारत नाखवा, हितेश शाह, जास्मिन गॅस, मनन पटेल, मनोहर सहतीया आदी उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी समाजासाठी भरीव कामगिरी करावी. मी आपल्याला नेहमीच मदत करेल, असे प्रतिपादन आमदार महेश बालदी यांनी या वेळी केले.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply