Breaking News

पनवेल तालुक्यात 167 जणांना कोरोना

पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात बुधवारी (दि. 1) कोरोनाचे तब्बल 167  रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 78 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पनवेल पालिका हद्दीत 136 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 60 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पनवेल ग्रामीणमध्ये कोरोनाचे 31 रुग्ण आढळले आहेत तर दिवसभरात 18 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पनवेल महापालिका हद्दीमधील आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेलमध्ये 32, नवीन पनवेलमध्ये 23, कळंबोलीत 22, कामोठे येथे 36, खारघरमध्ये 23, अशी विभागवार आकडेवारी आहे. तर बरे झालेल्या रुग्णसंख्येमध्ये पनवेलमध्ये 17, नवीन पनवेलचे 11, कळंबोलीतील 14, कामोठे येथील 11, खारघरमध्ये दोन, तळोजा येथे पाच यांचा समावेश आहे. महापालिका क्षेत्रात एकूण 2277 रुग्ण झाले असून 1392 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणे 61.13 टक्के आहे. 808 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 77 जणांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल ग्रामीण भागात नवीन आढळलेल्या रुग्णांमध्ये विचुंबे सात, करंजाडे पाच, सुकापूर तीन, आदई, कोनपोली, खेरणे येथे प्रत्येकी दोन, नांदगाव, शिवाजीनगर, उसरली खुर्द, दापोली-पारगाव, बामणडोंगरी, पाले खुर्द, आकुरली, कुडावे, बारापाडा, उलवे येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. तर बरे झालेल्या रुग्णांमध्ये आकुर्ली नऊ, उलवे दोन, करंजाडे दोन, सुकापूर, चिखले, देवद, उसरली खुर्द, वावंजे येथे प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. नागरिकांनी पुढील 10 दिवस पुरेल एव्हढा जीवनावश्यक वस्तु, भाजीपाला, मेडिसीन आणि फळे यांचा साठा करून ठेवावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

ग्रामीण भागातील एकुण कोरोना पॉझिटिव्ह असलेल्यांची रुग्णसंख्या 723 असून 356 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 351 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. आतापर्यंत 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कर्जतमध्ये आढळले नऊ रुग्ण

कर्जत : कर्जत तालुक्यातील उत्तरकार्यात संसर्ग अद्याप थांबण्याचे नाव घेत नसून आज आणखी चार नवीन रुग्णांची भर त्यात पडली आहे. तर कर्जत शहराबरोबर नेरळ, शेलू, हालीवली, आणि टेम्बरे या ग्रामीण भागातील गावातही पाच कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दीड शतक पार करण्याचे तयारीत आहे.

रोह्यात 19 नवे कोरोनाग्रस्त

रोहे : रोहे तालुक्यात बुधवारी 19 व्यक्ती कोरोना बाधित व्यक्ती आढळल्याची माहिती तहसिलदार कविता जाधव यांनी दिली. शहरासह तालुक्यात आतापर्यंत 111 कोरोना रुग्नाची संख्या झाली असुन यात 71 व्यक्ती या सक्रिय रुग्ण आहेत. तालुक्यात आता पर्यंत 40 रुग्ण बरे झाले आहे.

उरण तालुक्यात 15 जणांना लागण

उरण : वार्ताहर – उरण तालुक्यातील चीर्ले येथील दोन, करंजा येथील एक, केगाव येथील दोन, भेंडखळ येथील एक, गोवठणे येथील तीन, नवघर येथील एक, उरण येथील पाच अशा 15 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच तालुक्यातील करंजा, धुतुम, गावठाण, पाणदिवे, विंधणे  येथील प्रत्येकी एक व उरण येथील पाच असे 10 जणांना  डिस्चार्ज देण्यात आला आहे. उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 287  झाली आहे.

तालुक्यात कोटनाका, देऊळवाडी, बालई, बोरी, म्हातवली, मोरा, हनुमान कोळीवाडा, बोरीपाखाडी, गोवठणे, जासाई, दिघोडे, चीर्ले, नवीन शेवा या गावांमध्ये 3 ते 12 जुलै पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात येणार आहे, अशी महिती उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे  यांनी दिली.

नवी मुंबईत तब्बल 217 जण बाधित

नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत बुधवारी (दि. 1) 217 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने कोरोना बधितांची एकूण संख्या सहा हजार 823 झाली आहे. तर 80 जण बरे होऊन परतल्याने बरे झालेल्यांची एकूण संख्या तीन हजार 834 झाली आहे.

नवी मुंबई महापालिकेचा रिकव्हरी रेट एक टक्क्याने घसरून 56 टक्के झाला आहे. सद्य स्थितीत नवी मुंबईत दोन हजार 772 रुग्ण उपचार घेत आहेत. बुधवारी सहा जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 217 झाली आहे. नवी मुंबईतील विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर 30, नेरुळ 27, वाशी 18, तुर्भे 24, कोपरखैरणे 27, घणसोली 33, ऐरोली 49 व दिघा 10 असा समावेश आहे.

महापालिका मुख्यालयात शिरकाव

नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात अधिकारी व कर्मचारी वर्गालाच कोरोनाचा बाधा झाल्याने सर्वच धास्तावले होते. मुख्यालयातील पाच ते सहा अधिकारी व कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दोन दिवस पालिका इमारत दोन दिवस बंद राहणार आहे. या काळात संपूर्ण मुख्यालय इमारतीचे सॅनिटायजिंग करण्यात येणार आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply