Breaking News

रायगडात सहा जणांचा मृत्यू; 247 नवीन रुग्ण

पनवेल : रायगड जिल्ह्यात गुरुवारी तब्बल 247 नवीन रुग्ण आढळले असून सहा जणांचा मृत्यू झाला, तर 109 रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात 115,  पनवेल ग्रामीणमध्ये 67, रोहा 16, खालापूर 14, पेण 13, अलिबाग 12, कर्जत सहा आणि उरणमध्ये चार रुग्ण आढळले.  रायगडात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 4459 झाली असून 140 जणांचा मृत्यू झाला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठे, खारघर, ग्रामीणमध्ये गव्हाण, उरण मुळेखंड फाटा, खालापूर आणि पेण येथील व्यक्तींचा मृत्यू झाला. रायगडात आतापर्यंत 10021 टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी 4459 पॉझिटिव्ह आल्या. 140 टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. 2557 जणांनी कोरोनावर मात केली असून 1762 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply