Breaking News

वादळग्रस्तांना तातडीने मदत द्या; अंकिता प्रतीक दळवी यांची मागणी

मुरूड : प्रतिनिधी

नांदगाव ग्रामपंचायत हद्दीमधील नारळ-सुपारीच्या बागा निसर्ग चक्रीवादळात उद्ध्वस्त झाल्या. वादळ होऊन एक महिना पूर्ण झाला तरीही बागायतदारांना नुकसानभरपाईचा एकही रुपया मिळालेला नाही. मदत वाटप करण्यास दिरंगाई होत असून, तातडीने पैसे वाटप करावे, अशी मागणी नांदगाव ग्रामपंचायतीच्या सदस्य अंकिता प्रतीक दळवी यांनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती बोलताना दळवी यांनी सांगितले की, मुरूड तालुक्यातील सर्वात जास्त बागायत जमीन नांदगावमध्ये आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे येथील सुपारीची झाडे मुळासकट पडली आहेत. ही पडलेली झाडे बागायत जमीनीतून हटवण्यासाठी स्थानिक शेतकर्‍यांना मजूर वर्ग घेऊन मोठा खर्च आला आहे. त्याचप्रमाणे सुपारीचे पीक गेल्याने शेतकरी दुःखी झाला आहे. झाडे मुळासकट पडल्याने पुन्हा शेतकर्‍याला पीक घेता येणार नाही अशी बिकट परस्थती निर्माण होऊन सुद्धा नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना अद्याप भरपाई मिळत नाही, हे दुर्दैवी आहे  शेतकरी संकटात असून शेतकर्‍यांना तातडीची मदत करणे आवश्यक असताना मदत देण्यास विलंब होत आहे. दरम्यान, बागायत जमिनीसाठी शासन निर्णयाप्रमाणे हेक्टरी 50 हजार रुपयांचे वाटप करीत असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी व्ही. डी. अहिरे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस दिली.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply