Breaking News

पनवेल मनपा हद्दीतील खाजगी रुग्णालयांचे होणार लेखापरीक्षण

पनवेल : प्रतिनिधी – पब्लिक ट्रस्ट म्हणून नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांना रुग्णांना बिल आकारणीबाबत व रुग्ण सेवेबाबत काही निर्देश दिले आहेत. शासनाच्या आरोग्य विषयक विविध योजना अंतर्गत रुग्णांना लाभ दिले जात असून असे लाभ संबंधित रुग्णास देण्याबाबतही रुग्णालयांवर जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. ती जबाबदारी खाजगी रुग्णालये पूर्ण करीत आहेत का नाही याबाबत महानगरपालिका कार्यक्षेत्रात असलेल्या खाजगी रुग्णालयांचे लेखा परीक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन लेखा परीक्षकांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली. 

जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूची लागण राज्यातही वेगाने पसरत आहे. या रोगाचा प्रसार टाळण्यासाठी शासनाने राज्यभर अनेक प्रतिबंधात्मक उपायोजना लागू केल्या आहेत. राज्य शासनाने 21 मेच्या अधिसूचनेद्वारे पब्लिक ट्रस्ट म्हणून नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांना रुग्णांना बिल आकारणीबाबत व रुग्ण सेवेबाबत सविस्तर निर्देश दिलेले आहे. शासनाने अशा रुग्णालयांच्या 80% बेड्स शासकीय नियंत्रणाखाली ठेवण्याबाबत काही निर्देश दिले आहेत.

आरोग्य विषयक विविध योजना अंतर्गत रुग्णांना लाभ दिले जात असून असे लाभ संबंधित रुग्णास देण्याबाबतही अशा रुग्णालयांवर जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. वरील बाबींचा विचार करून पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात असलेल्या खाजगी रुग्णालयांची लेखा व अनुषंगिक बाबी तपासण्यासाठी लेखा परिक्षक म्हणून सिडको भवन येथील लेखाधिकारी रोशनी रसाळ व कोकण भवन येथील वेतन पडताळणी पथकाचे लेखाधिकारी आर. डी. दातार यांची नियुक्ती केली आहे.

नियुक्त केलेले हे अधिकारी शासनाचे वेळोवेळी प्राप्त निर्देश विचारात घेऊन संबंधित खाजगी रुग्णालयांची तपासणी करणार आहेत व आवश्यकतेनुसार कारवाई प्रस्तावित करणार आहेत. अशी माहिती उपायुक्त जनसंपर्क जमीर लेंगरेकर यांनी दिली.

आयुक्तांचा निर्णय

कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करुन महापालिका आयुक्तांना त्यांच्या कार्यक्षेत्रात कोविड-19वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी ते सक्षम असतील असे कायद्यान्वे घोषित करण्यात आले आहे. त्याद्वारे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी निर्णय घेतला आहे.

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply