पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 3) कोरोनाचे तब्बल 233 रुग्ण आढळले आहेत. तर 68 जण कोरोनामुक्त झाले. तसेच एकाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पालिका हद्दीत 186 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 61 रुग्ण बरे झाले. ग्रामीणमध्ये 47 रुग्ण आढळले तर सात रुग्ण बरे झाले आहे.
महापालिका हद्दीत नवीन पनवेल येथील एका रुग्णाचे निधन झाले आहे. तर आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल 50, नवीन पनवेल 34, कळंबोली 24, कामोठे 43, खारघर 33, तळोजा दोन अशी आकडेवारी आहे. तर बरे झालेल्या रुग्णसंख्येत पनवेल 15, नवीन पनवेल एक, कळंबोलीत 10, कामोठे 15, खारघर 13, तळोजा येथे सात यांचा समावेश आहे. महापालिका क्षेत्रात एकूण 2578 रुग्ण झाले असून 1518 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणे 58.88 टक्के आहे. 980 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 80 जणांचा मृत्यू झाला आहे.
पनवेल ग्रामीण भागात नवीन आढळलेल्या रुग्णांमध्ये उलवे 16, विचुंबे सहा, सुकापूर चार, देवद तीन, नांदगाव तीन, दापोली, साई, वहाळ येथे प्रत्येकी दोन, आजीवली, बेलवली, केळवणे, कोळवाडी, कोपर, नेरे, ओवळे, उसर्ली, वलप येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. तर बरे झालेल्या रुग्णांमध्ये विचुंबे तीन, उलवे दोन, आकुर्ली व सुकापूर प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. पनवेल ग्रामीण भागातील (उरणसहीत) एकुण कोरोना पॉझिटिव्ह असलेल्यांची रुग्णसंख्या 1141 असून 605 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 514 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. आतापर्यंत 22 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नवी मुंबईत 257 जणांना लागण; 151 रुग्ण झाले बरे
नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत शुक्रवारी 257 जणांचा कोरोनाची लागण झाली. त्यामुळे कोरोना बधितांची एकूण संख्या सात हजार 345 झाली आहे, तर 151 जण बरे होऊन घरी परतले. बरे झालेल्यांची एकूण संख्या चार हजार 116 झाली आहे. तसेच आठ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 232 झाली आहे.
सद्यस्थितीत नवी मुंबईत दोन हजार 997 रुग्ण उपचार घेत आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची विभागवार आकडेवारी बेलापूर 29, नेरुळ 35, वाशी 16, तुर्भे 9, कोपरखैरणे 61, घणसोली 43, ऐरोली 46 व दिघा 18 अशी आहे.
मुरूड तालुक्यात 13 जण पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू
मुरुड : प्रतिनिधी – मुरूड तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांमध्ये 13 ने भर पडली आसुन एका 80 वर्षीय आजीचा या मध्ये मृत्यु झाला आहे. एकूण पाँझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या आतापर्यंत तब्बल 41 झाली आहे. अजून काही जणांचे नमुने घेतले असून, त्यांचे अहवालाचा रिपोर्ट येणे बाकी आहे.
यामध्ये मुरूड शहरातील तीन कोरोना पॉझीटीव्ह तर एक मयत, एकदरा गावातील एक, शिघ्रे गावातील सहा, बोर्ली गावातील दोन असे एकूण 13 कोरोना पॉझिटिव्ह आहेत.
रोहा तालुक्यात 33 जणांना संसर्ग
रोहे : प्रतिनिधी – रोहा तालुक्यात शुक्रवारी (दि. 3) 33 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अशी माहिती रोहा तहसीलदार कविता जाधव यांनी दिली आहे. या मध्ये 11 महिला व 22 पुरुषांचा समावेश आहे. तालुक्यात सापडलेल्या 33 कोरोना संसर्गाने बाधीत पैकी शहरात 10 तर ग्रामीण भागात 23 व्यक्ती सापडले आहेत. रोहा तालुक्याची कोरोना बाधितांची संख्या शंभरी पार करीत 103 एवढी झाली आहे. त्यामुळे रोहा तालुक्यात आता पर्यंत एकुण 160 कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी तालुक्यात तीन व्यक्तीनी तर शहरात पाच व्यक्तींनी कोरोनावर मात केली.
कर्जतमध्ये चौघांना कोरोना
कर्जत : शहरात शुक्रवारी चार जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 155 वर गेली आहे. यामध्ये जुन्या एसटी स्टँड भागात राहणार्या एका 45 वर्षाच्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दहिवली शिवाजी नगरमध्ये राहणारी 46 वर्षीय महिला, गुंडगे परिसरात राहणारी 58 वर्षीय व्यक्ती, भाकरीचापाडा गावात राहणार्या 34 वर्षीय तरुण यांचा समावेश आहे.
उरणमध्ये 13 जण बाधित
उरण : तालुक्यात शुक्रवारी कोरोनाचे 13 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन कोरोना मुक्त झाले आहेत. यामध्ये धुतुम तीन, गोवठणे, सावरखार, जासई, जेएनपीटी, रांजणपाडा, वैश्वि, नागाव, वशेणी, सोनारी व नवीनशेवा येथे प्रत्येकी एक असे आढळून आलेले रुग्ण आहेत. तालुक्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 69 पोहोचली आहे.
अलिबाग तालुक्यात आढळले 19 कोरोनाग्रस्त
पेण : प्रतिनिधी – पेण तालुक्यात शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असुन यामुळे मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत आहे. यामध्ये जेएसडब्ल्यु कंपनीतील कामगारांनाही कोरोनाची लागण झालेली असुन कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी जेएसडब्ल्यू कंपनी काही काळ बंद करावी, अन्यथा तीव्र आंदोलन
छेडण्यात येईल, असा इशारा आमदार रविशेठ पाटील यांनी दिला आहे.
अलीकडच्या काळात पेण तालुक्यात कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातला असुन आमटेम, गड्ब, झोतिरपाडा तसेच शहरी भागात कोरोना संसर्गित कर्मचार्यामुळे अनेक ठिकाणी लागण झालेली असुन आता कंपनी बंद केल्याशिवाय पर्याय नाही याबाबत जिल्हाधिकारी याच्याशी देखील चर्चा करण्यात आली असुन जर लवकरात लवकर कंपनीतील काम बंद झाले नाही तर कोरोना संसर्गाचा धोका वाढणार आहे.
कंपनीसाठी जिल्हा प्रशासन किंवा शासन जर दोन तालुक्यातील जनतेला संकटात टाकू पहात असेल तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे शेवटी आमदार रविशेठ पाटील यांनी सांगितले.