Breaking News

सतीश लेले ‘कोविड योद्धा’ने सन्मानित

रेवदंडा ः प्रतिनिधी – नागाव येथील कार्यतत्पर तसेच परिसरातील गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे रेवदंडा अर्बन बँकेचे संचालक सतीश लेले यांना कोरोना महामारीच्या काळात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल परशुराम सेवा संघ महाराष्ट्र व मानवाधिकार सुरक्षा संघ या दोन राज्यस्तरावरील नामांकित संस्थांकडून कोविड योद्धा पुरस्काराने प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात

आले आहे.

टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर अलिबाग तालुक्यातील गोरगरीब व गरजू नागरिकांना जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा तसेच आरोग्य संरक्षक किटचे वाटप करण्याचा प्रारंभ त्यांनी केला. त्याचबरोबर परजिल्ह्यातील कुटुंबांना जेवण, चहा, नाष्टा वाटप करण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या या सेवाभावी कार्याची दखल घेऊन त्यांना परशुराम सेवा संघ महाराष्ट्र व मानवाधिकार सुरक्षा संघ संस्थांनी कोविड योद्धा पुरस्काराने

सन्मानित केले.

रेवदंडा अर्बन बँक संचालक मंडळाच्या वतीने 29 जून रोजी झालेल्या सभेत बँकेच्या संचालक मंडळाने एकमताने ठराव घेऊन त्यांना कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते अलिबाग येथे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. नागाव येथील रहिवासी असलेले सतीश लेले हे रेवदंडा अर्बन बँकेचे संचालक तसेच भारतीय जनता पक्षाचे राज्य परिषदेचे सदस्य आहेत. कोविड योद्धा पुरस्काराबद्दल त्यांचे मित्रमंडळी, हितचिंतकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply