Breaking News

अमानूषपणे मारहाण करताना सुशील कुमार कॅमेर्यात कैद

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्येप्रकरणी ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारला दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. छत्रसाल स्टेडियममध्ये झालेल्या अमानुष मारहाणीनंतर सागरचा मृत्यू झाला होता. यानंतर सुशील आपल्या साथीदारांसोबत फरार होता. अखेर पोलिसांनी त्याच्यासह इतर आरोपींना अटक केली असून सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. दरम्यान, सुशीलने सागरवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

माजी कनिष्ठ राष्ट्रीय विजेत्या सागरला सुशील कुमार आणि त्याच्या साथीदारांनी सुमारे 25 मिनिटे मारहाण केली होती. पोलीस नियंत्रण कक्षात माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले, तेव्हा ही मारहाण थांबवण्यात आली. सुशील कुमारने शहरातील कुस्ती क्षेत्रात आपली दहशत पसरवण्यासाठी हत्येचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सुशील कुमारने आपला मित्र प्रिन्सला व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सांगितले होते. सुशील आणि त्याच्या सहकार्‍यांनी पीडितांना जनावरांप्रमाणे मारहाण केली.

सुवर्णपदक विजेत्या कुस्तीपटूला अटक

नवी दिल्ली ः भारताचा स्टार कुस्तीपटू सुशील कुमारच्या अटकेनंतर राष्ट्रीय स्तरावरील माजी सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू मनजितला दरोडा आणि अवैध दारुच्या विक्रीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. कौशल गँगचा सक्रिय सदस्य मनजितला पोलिसांनी 24 मे रोजी नजफगड भागातून अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि चोरी केलेले मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply