Breaking News

सुरेश रैनाचा विक्रम; पाच हजार धावांचा टप्पा ओलांडला

चेन्नई : वृत्तसंस्था

चेन्नई सुपरकिंग्जच्या सुरेश रैनाने पहिल्याच सामन्यात आपल्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. आयपीएलच्या इतिहासात पाच हजार धावांचा टप्पा ओलांडणारा रैना पहिला फलंदाज ठरला आहे. बंगळुरुविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने या अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

पहिल्या सामन्यात फलंदाजीला येईपर्यंत रैनाच्या नावावर आयपीएलमध्ये 4985 धावा जमा होत्या. पाच हजार धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी आवश्यक असलेल्या 15 धावा काढत रैनाने इतिहासाची नोंद केली. या सामन्यात विराट कोहलीलाही हा विक्रम करण्याची संधी होती, मात्र यासाठी आवश्यक असलेल्या 52 धावा काढणे त्याला जमले नाही. पहिल्या सामन्याआधी कोहलीच्या खात्यात आयपीएलमध्ये 4948 धावा होत्या. पहिल्या सामन्यात तो केवळ 6 धावाच काढू शकला.

. …………………………………………………………….. ……

हरभजनचीही किमया

चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणार्‍या हरभजन सिंगने पहिल्याच सामन्यात आपली जादू दाखवत इतिहास रचला आहे. हरभजनने या सामन्यात चार षटकांमध्ये 20 धावा देत तीन बळी मिळवले. आयपीएलमध्ये आतापर्यंत स्वत:च्याच गोलंदाजीवर सर्वाधिक झेल पकडणार्‍या गोलंदाजांच्या यादीमध्ये हरभजनने अव्वल क्रमांक पटकावला आहे. पहिल्या सामन्यात हरभजनने मोईन अलीचा स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल पकडला. हरभजनने स्वत:च्याच गोलंदाजीवर हा अकरावा झेल पकडत इतिहास रचला आहे. हा पराक्रम करताना हरभजनने चेन्नईच्याच ड्वेन ब्राव्होला पिछाडीवर टाकले आहे. ब्राव्होने असा पराक्रम 10 वेळा केला होता.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply