रोहे : प्रतिनिधी – डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठण रेवदंडाच्या वतीने नेहमीच समाज प्रबोधनाचे कार्य चालु असते. समाह प्रबोधनाबरोबर अनेक समाज हिताचे उपक्रम राबविले आहे. समाज प्रबोधनाबरोबर समाज हिताचे उपक्रम राबविण्यात येत असुन या उपक्रमा अंतर्गत रोहा पोलीस स्टेशनला 20 बॅरीकेडस देण्यात आले आहेत.
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्टान, रेवदंडा यांच्या सौजन्याने देण्यात आलेले 20 बॅरीकेडस रोहा-अष्टमी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांच्या हस्ते रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांना सुपुर्द करण्यातआले. या वेळी पोलीस अधिकारी रणजीत जाधव, पोलीस म्हात्रे व रोहा श्रीसदस्य उपस्थित होते.