सहा जणांचा मृत्यू; 116 रुग्णांची कोरोनावर मात
पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 6) कोरोनाचे तब्बल 144 रुग्ण आढळले आहेत. तर 116 जण कोरोनामुक्त झाले. तसेच सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पालिका हद्दीत 124 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 75 रुग्ण बरे झाले. ग्रामीणमध्ये 20 रुग्ण आढळले तर 41 रुग्ण बरे झाले आहे.
महापालिका हद्दीत नवीन पनवेल सेक्टर 13 येथील ए टाईपमधील रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल 20, नवीन पनवेल 15, कळंबोली 24, कामोठे 21, खारघर 27, तळोजा 17 अशी आकडेवारी आहे. तर बरे झालेल्या रुग्णसंख्येत पनवेल 30, नवीन पनवेल पाच, कळंबोलीत नऊ, कामोठे 12, खारघर 16, तळोजा येथे दोन यांचा समावेश आहे.
महापालिका क्षेत्रात एकूण 2982 रुग्ण झाले असून 1704 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणे 57.14 टक्के आहे. 1194 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 84 जणांचा मृत्यू झाला आहे.
पनवेल ग्रामीण भागात नवीन आढळलेल्या रुग्णांमध्ये करंजाडे तीन, आदई, खानावळें, पळस्पे येथे प्रत्येकी दोन, बामणडोंगरी, डोलघर, कोपर, नांदगाव, पडघे, शिरढोण, शिवकर, उलवे, वहाळ, वावेघर, विचुंबे येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. तर बरे झालेल्या रुग्णांमध्ये उलवे सहा, करंजाडे पाच, नेरे पाच, कोळखे चार, साई, विचुंबे येथे प्रत्येकी तीन, पालेबुद्रुक, दापोली येथे प्रत्येकी दोन, तुराडे, केळवणे, कोपर, बारापाडा, शिरढोण, चिखले, चिंचपाडा, वावंजे, सुकापूर, दिघाटी, आदई येथे प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. तसेच मयत झालेल्या रुग्णांमध्ये केळवणे, वडघर, उलवे, कोपर, खानावळे येथे प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
पेणमध्ये 12 नव्या बाधित रुग्णांची नोंद
चार जण बरे; एकाची झुंज अपयशी
पेण : प्रतिनिधी – पेण तालुक्यात सोमवारी (दि. 6) कोरोनाचे 12 नवीन रुग्ण आढळले असून चार जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आढळलेल्या रुग्णांमध्ये रामवाडी दोन, कुंभार आळी दोन, हमरापुर, अंतोरे, तांबडशेत, कोपर, जोहे, चावडी नाका, तरणखोप, कोंबडपाडा येथे प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. तर बरे झालेल्या रुग्णांमध्ये इस्त्रायल आळी तीन व नरदास चाळ येथील एकाचा समावेश असून जोहे येथील 77 वर्षीय वृद्धाचा मृत्यू कोरानामुळे झाला आहे. तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची संख्या 193 वर गेली असुन यापैकी 88 रुग्ण बरे झाले आहेत व पाच जण मयत झाले आहेत तसेच 100 जणांवर उपचार सुरु आहेत. लॉकडाऊन पूर्वी कोरोनामुक्त असलेल्या पेण तालुक्यात लॉकडाऊन उठताच कोरोना रुंगणांची संख्या वाढत गेली. यामुळे पेणकर चांगलेच धास्तावले आहेत.
उरणमध्ये 14 रुग्णांची भर; एकाचा मृत्यू
उरण : प्रतिनिधी, वार्ताहर – उरण तालुक्यात सोमवारी (दि. 6) कोरोनाचे 14 रुग्ण आढळून आले आहेत. तर एकाच मृत्यू झाला आहे. सहा रुग्ण पूर्ण बरे झाले आहे. मात्र शंभरी पार केल्याने उरण तालुक्याचा पुन्हा एकदा रेडझोनमध्ये समावेश झाला आहे.
आढळलेल्या रुग्णांत उरण पाच, नवापाडा तीन, खोपटे दोन, रांजणपाडा, जसखार,सावरखार जेएनपीटी येथे प्रत्येकी एक असे एकूण 14 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. याशिवाय तालुक्यातील उरण, चिर्ले, गोवठणे, सोनारी, द्रोणागिरी व चाणजे येथील प्रत्येकी एक असे एकूण सहा रुग्ण पूर्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर जासई येथील एका रुग्णाचा उपचार घेत असतांना मृत्यू झाल्याचे दुर्घटना घडली आहे.
अलिबाग तालुक्यात 44 नवे रुग्ण
अलिबाग : प्रतिनिधी – अलिबाग तालुक्यात सोमवारी (दि. 6) कोरोनाचा संसर्ग झालेले 44 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधितांचा एकूण आकडा 223वर जाऊन पोहोचला आहे, तर आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून, 98 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
तालुक्यात सहाणगोठी चार, कुदे येथे तीन, आरसीएफ कॉलनी कुरुळ येथे सहा, इंद्रप्रस्थ सोसायटी गोंधळपाडा चार, चोरगुंडी पोयनाड येथे सहा, मोठे शहापूर येथे तीन, रायवाडी आक्षी येथे दोन, नवेनगर कुरुळ येथे तीन, सुडकोली येथे दोन, आदर्शनगर कुरुळ येथे दोन, चेंढरे दोन, वरसोली दोन, अलिबाग एक, मांडवखार, सातिर्जे, आंबेपूर येथे करोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत.
कर्जतमध्ये दोघांना लागण; एकाचा मृत्यू
कर्जत : बातमीदार – कर्जत तालुक्यात सोमवारी (दि. 6) दोन नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर माणगाव तर्फे वरेडी येथील डीग्नीटी लाईफस्टाईल मधील वयस्कर महिलेचा मृत्यू झाला असून त्यांना कोरोनाची लागण झाली होती.
नेरळ गावातील 51 वर्षीय महिला रुग्णाला कोरोना झाला आहे. टेपआळी भागात जुन्या पोलीस ठाणे येथील ही महिला रुग्ण आहे, तर कर्जत शहरातील गुंडगे कॉसमॉस इमारतीमधील आरोग्य विभागात काम करणार्या महिला रुग्णाचे कुटुंबातील त्यांचे वडील या 63 वर्षीय रुग्णाला कोरोनाची लागण झाली आहे. कर्जत तालुक्यात कोरोनाचे 166 रुग्ण झाले असून त्यातील 111 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर आता केवळ 45 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.