Breaking News

‘मूषक नियंत्रण कामगारांवरील अन्याय दूर करा’

नवी मुंबई ः बातमीदार

जुलै महिना उजाडला तरी अजून पालिकेत मूषक नियंत्रण विभागात काम करणार्‍या कामगारांचे मे व जून महिन्याचे वेतन झाले नाही. त्यामुळे मूषक नियंत्रण कामगारांच्या वेतन विलंबाबाबत होणारा अन्याय दूर करण्याची मागणी सानपाड्यातील भाजप कार्यकर्ते पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे. नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनात गेल्या अनेक वर्षांपासून मूषक नियंत्रण विभागात कंत्राटी कामगार मूषक नियंत्रणाचे काम इमानेइतबारे करीत आहेत. कोरोनाच्या संकटकाळातही कॉलनी तसेच गावठाण परिसरात, गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात, झोपडपट्टी परिसरातही आपला जीव धोक्यात घालून हे कामगार काम करीत आहेत. या कामगारांना मे व जून महिन्याचे वेतन मिळाले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या कामगारांची वेतनाबाबत ससेहोलपटच होत आहे. हे कामगार व त्यांचा परिवार कोरोनाने नाही, पण आर्थिक कुपोषण आणि भूकबळीने दगावण्याची भीती आहे. आपण या प्रकरणी लक्ष घालून संबंधित मूषक नियंत्रण कामगारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आमले यांनी आयुक्तांकडे केली आहे.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply