Breaking News

नवी मुंबईत 159 जण कोरोनामुक्त 115 जण पॉझिटिव्ह

नवी मुंबई ः बातमीदार

नवी मुंबईत मंगळवारी 159 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले, तर 115 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गेला आठवडाभर बाधितांची संख्या वाढली असताना मंगळवारी कमी झालेल्या रुग्णसंख्येने नवी मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कोरोनाबधितांची एकूण संख्या आठ हजार 72 झाली आहे. बरे झालेल्यांची एकूण संख्या चार हजार 745 झाली आहे. नवी मुंबईत आतापर्यंत 22 हजार 809 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 14 हजार 477 जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. सद्यस्थितीत नवी मुंबईत तीन हजार 67 रुग्ण उपचार घेत आहेत. मंगळवारी आठ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 260 झाली आहे. नवी मुंबईतील विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर नऊ, नेरूळ 30, वाशी नऊ, तुर्भे 11, कोपरखैरणे 19, घणसोली 13, ऐरोली 21 व दिघा तीन असा समावेश आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply