Breaking News

आरोग्य महाशिबिराची जबाबदारी यशस्वीपणे बजावा : अरुणशेठ भगत

पनवेल : रामप्रहर वृत्त

शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे हा आपला नारा आहे. त्या अनुषंगाने शहरांसोबतच गाव-खेड्यापर्यंतच्या लोकांपर्यंत महाशिबिराचा लाभ मिळाला पाहिजे, यासाठी सर्व समित्यांनी आपली जबाबदारी यशस्वीपणे बजावावी, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष व भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी खांदा कॉलनी येथे केले.

सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार महाशिबिर 4 ऑगस्ट रोजी खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयात होणार आहे. या महाशिबिराच्या नियोजनासंदर्भातील आढावा बैठक गुरुवारी (दि. 25) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली खांदा कॉलनी येथे झाली.

या बैठकीस भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, महापौर डॉ. कविता चौतमोल, शहराध्यक्ष जयंत पगडे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा कल्पना राऊत, तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, शहराध्यक्षा मुग्धा लोंढे, माजी उपमहापौर चारुशीला घरत यांच्यासह विविध समित्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

‘अनेक लोक श्रीमंत आहेत, पण प्रत्येकाकडे दानत नसते. लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर हे समाजासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. सामाजिक बांधिलकी म्हणून वर्षभर ते विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून जनसेवा करीत आहे. आरोग्य महाशिबिर त्यातील एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. प्रत्येक रुग्णाची तज्ज्ञांमार्फत तपासणी व सात दिवसांचे औषधोपचार, नाश्ता, भोजन, वाहतूक व्यवस्था पूर्णपणे मोफत केली जात असून, रुग्णांची जास्तीत जास्त सेवा करणे हा आपला उद्देश आहे, असे अरुणशेठ भगत यांनी सांगितले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply