Breaking News

राजगृह तोडफोडप्रकरणी आरोपींना अटक करा

देवेंद्र फडणवीस यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर मंगळवारी (दि. 7) संध्याकाळी अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. याबाबत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निषेध नोंदवला असून, आरोपींना तत्काळ अटक केली जावी, अशी मागणी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करीत म्हटले आहे की, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहावर करण्यात आलेला हल्ला हा अत्यंत निषेधार्ह आहे. आरोपींना तत्काळ अटक व्हावी, अशी आमची मागणी आहे.
या संदर्भात मी स्वतः भीमराव (दादासाहेब) आंबेडकर यांच्याशी फोनवर चर्चा केली तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्तांशी चर्चा करून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply