पनवेल : रायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 9) कोरोनाचे 411 नवीन रुग्ण आढळले असून, 10 जणांचा मृत्यू झाला, तर 188 रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात 165, पनवेल ग्रामीणमध्ये 57, अलिबाग 33, उरण 30, पेण 27, म्हसळा 22, खालापूर 19, कर्जत 16, माणगाव 14, श्रीवर्धन 12, मुरूड 10, रोहा तीन, सुधागड, महाड व पोलादापूरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. रायगडात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 6518 झाली असून 189 जणांचा मृत्यू झाला. पनवेल महापालिका क्षेत्रात दोन, ग्रामीणमध्ये सहा, तर कर्जत व सुधागड येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. रायगडात आजपर्यंत 24,054 टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी 6518 पॉझिटिव्ह आल्या. 281 रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. 3686 जणांनी कोरोनावर मात केली असून 2643 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …