Breaking News

टिकटॉक फेम तरुणीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; पोलिसांत गुन्हा दाखल

पनवेल : वार्ताहर

टिकटॉकवर प्रसिद्ध असलेल्या एका तरुणीचा प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवताना बनवलेला आणि तिच्याकडून चुकून स्नॅपचॅटवर पोस्ट झालेला व्हिडीओ काही लोकांनी इन्स्टाग्राम आणि यू ट्यूबवर अपलोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या प्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

या प्रकरणातील 22 वर्षीय टिकटॉकस्टार तरुणी खारघरमध्ये राहावयास असून ती हिंदी, पंजाबी भाषांतील चित्रपटांत अभिनेत्री, गायिका आणि मॉडेल म्हणून काम करते तसेच ती टिकटॉकवर व्हिडीओ अपलोड करीत असल्याने देश-विदेशात तिचे चाहते आहेत. या तरुणीने आपल्या प्रियकरासोबत स्वेच्छेने शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडीओ बनविला होता. तो व्हिडीओ चुकून तिच्याकडून स्नॅपचॅटवर पोस्ट झाला होता. याबाबत तिला मैत्रिणीने कळविल्यावर हा व्हिडीओ 100 लोकांनी पाहून त्यातील सात जणांनी तो रेकॉर्ड केल्याचे तिला समजले. त्यानंतर तक्रारदार तरुणीने  व्हिडीओ अकाऊंटमधून दोन तासांत डिलीट केला, मात्र त्यानंतर काही दिवसांनी हाच व्हिडीओ इन्स्टाग्राम व यू ट्यूबवर व्हायरल झाल्याचे चाहत्यांकडून तिला समजले. त्यानंतर या तरुणीने याबाबत अधिक माहिती घेतली असता तिचा व्हिडीओ वेगवेगळ्या लिंकवर व्हायरल होऊन त्यावर तिच्याबाबत घाणेरड्या व अपमानास्पद भाषेत टीका केल्याच्या कमेंट्स आढळून आल्या तसेच शुभम श्रीवास्तव, आसिफ व शोएब खोसा यांनी हा व्हिडीओ यू ट्यूबवर व्हायरल करून आर्थिक फायदा घेण्यास सुरुवात केल्याचे या तरुणीच्या लक्षात आले. या कालावधीत संबंधित तरुणीला काही व्यक्तींनी तो व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल करण्याची धमकी इन्स्टाग्रामवर दिल्याचे तिने खारघर पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. दरम्यान, या तरुणीने प्रसिद्धीसाठी केलेला हा स्टंट असल्याची चर्चाही सोशल मीडियावर सध्या सुरू आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply