उरण : वार्ताहर
महाडमधील पूरग्रस्तांसाठी उरण नगर परिषदतर्फे जीवनावश्यक वस्तूंची मदत देण्यात येत आहे. शुक्रवारी (दि. 23) नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, नगरसेवक कौशिक शाह, मुख्याधिकारी संतोष माळी, सविन म्हात्रे, नगरसेवक राजेश ठाकूर आणि सर्व नगरसेवक, नगरसेविका, उरण नगरपरिषदेतील सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी, उरण शहरातील दानशूर व्यक्ती आदींनी मदत केली.
साड्या 100, टॉवेल 50, मॅक्सी (गाऊन) 100, परकर 100, टी शर्ट 50, टॅक पॅन्ट 10, बेडशीट व चादर 300 व इतर कपडे 1000, तांदुळ, बिस्कीट आदी जीवनावश्यक वस्तू टेम्पोमध्ये पाठविण्यात आले. या वस्तू उरण नगर परिषदेमध्ये जमा करून माणगाव तहसील कार्यालयात जमा करण्यात आल्या. तेथुन जिथे जरुरी आहे तिथे पाठविण्यात येणार आहे.
या वेळी उरण नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, मुख्याधिकारी संतोष माळी, नगरसेवक राजेश ठाकूर, माजी नगरसेवक नवीन राजपाल, सविन म्हात्रे, नगर अभियंता अनुप कुमार कांबळे, कनिष्ठ अभियंता झुंबर माने, आरोग्य निरीक्षक हरेश तेजी, जगदीश म्हात्रे, सहाय्यक नगर रचनाकार सचिन भानुसे, कर निर्धारण अधिकारी मोनिका शिरसाट, संगणक अभियंता धनंजय थोरात, मालमत्ता पर्यवेक्षक कोमल नलावडे, अनिल कासारे, धनुश कासारे, सर्व कर्मचारी, अधिकारी व सफाई कामगार आदी उपस्थित होते.