Breaking News

आत्महत्येप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

पनवेल ः वार्ताहर

पनवेल शहरात राहणार्‍या राजेश मालपाणी यांनी मागील महिन्यात विष प्राशन करून आत्महत्या केली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी आत्महत्येस जबाबदार असलेल्या कर्ज घेणार्‍या व देणार्‍या अशा सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

राजेश बाबूलाल मालपाणी (46) हे पनवेलमध्ये आपल्या कुटुंबासह राहत होते. नवीन पनवेल येथील एका खासगी शाळेत ते क्लार्क म्हणून काम करीत होते. मालपाणी हे काही जणांकडे अकाऊंटची कामेही करीत होते. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या ओळखीतून काही जणांना व्याजाने रक्कम मिळवून दिली होती, परंतु सदर कर्जाची रक्कम परत करण्यास त्या इसमांनी टाळाटाळ केली. त्यामुळे त्यांनी ज्यांच्याकडून पैसे घेतले होते त्यांनी मालपाणी यांच्यामागे तगादा लावला. यातूनच मालपाणी यांनी 19 जूनला आत्महत्या केली. मालपाणी यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी त्यांच्या पत्नीस सापडली. त्यात व्याजाने पैसे देण्या-घेण्याच्या व्यवहारातून सहा जणांनी लावलेला तगादा व धमकी दिल्याचा उल्लेख होता. या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. त्या चिठ्ठीच्या आधारे पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply