Breaking News

ऑस्ट्रेलियात सुपर ओव्हरचा नियम बदलला

दुबई : वृत्तसंस्था

बिग बॅश लीगमध्ये सुपर ओव्हर अनिर्णित राहिल्यास पुन्हा सुपर ओव्हर खेळवण्यात येणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) या नव्या नियमाबाबत माहिती दिली.

सरत्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील मूळ सामना अनिर्णित राहिला त्या वेळी सुपर ओव्हर खेळवण्यात आली, पण सुपर ओव्हरमध्येही दोन्ही संघांची धावसंख्या समानच राहिली आणि अखेर मूळ सामन्यातील चौकार-षटकारांच्या संख्येवर इंग्लंडला विश्वविजेता ठरवण्यात आले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) या नियमाबाबत त्यांच्यावर खूप टीका झाली होती. या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाने नवे पाऊल टाकले आहे.

बिग बॅश लीगमध्ये जर दोन संघांमधील सामना अनिर्णित राहिला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल, पण ती सुपर ओव्हर अनिर्णित राहिल्यास एक संघ स्पष्ट विजेतेपद मिळवेपर्यंत सुपर ओव्हरचा खेळ सुरूच ठेवण्यात येईल, मात्र साखळी सामन्यात सुपर ओव्हर अनिर्णित राहिल्यास दोन्ही संघांना गुण विभागून दिले जातील, असे ‘सीए’तर्फे स्पष्ट करण्यात आले.

Check Also

नवी मुंबई विमानतळाला ‌‘दिबां‌’चे नाव द्या; भाजपचे लक्षवेधी आंदोलन

पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी …

Leave a Reply