27 जुलैपासून नियमित सुनावणी
मुंबई : प्रतिनिधी
मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाकडून तुर्तास कोणताही अंतरिम आदेश अथवा वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली नाही. आता या संदर्भात 27 जुलैपासून नियमित सुनावणी होणार आहे.
राज्य सरकारच्या मराठा आरक्षण आणि वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश परीक्षेच्या निर्णयावर बुधवारी (दि. 15) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती एल. एन. राव यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर पक्षकारांनी आपापली बाजू या वेळी मांडली.
दरम्यान, मराठा आरक्षणावर 27 जुलैला पुढील सुनावणी होणार असून, ती अंतिम असणार आहे. न्यायालयाने या सुनावणीसाठी तीन दिवसांचा वेळ निश्चित केला आहे. दीड दिवस याचिकाकर्त्यांना, तर दीड दिवस दुसर्या बाजूला युक्तिवादासाठी मिळणार आहे.