उरण : वार्ताहर
उरण शहरात कोरोनाचे रुग्ण सापडल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय योजना करण्याबाबत या अनुषंगाने उरण नगरपरिषद वतीने नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेच्या हददीतील नागरिकांची माहिती, सर्वेक्षण करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
उरण नगरपरिषद हद्दीत ज्या भागात कोरोना रुग्ण आढळले आहेत. अशा भागात तसेच परिसरात घरोघरी जाऊन माहिती गोळा करणे काम सुरु आहे. जेणे करून त्या-त्या भागात कोरोना चा प्रादुर्भाव होणार नाही. त्याचप्रमाणे कोरोना संदर्भात पुढे होणारा प्रादुर्भाव लवकर समजेल अशा उद्देशाने सर्वेषण
सुरु आहे.
या कामी उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, नगरसेवक रवी भोईर, उरण शहर भाजप अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, उरण नगरपरिषद, आरोग्य सभापती रजनी सुनील कोळी उरण नगरपरिषदचे नोडल अधिकारी अनिल जगधनी, सर्व नगरसेवक, नगरसेविका, आरोग्य निरीक्षक महेश लवटे, कामगार आदींचे सहकार्य मिळत आहे.
उरण नगरपरिषदेच्या वतीने करण्यात येणार्या सर्वेक्षणाचे नोडल अधिकारी अनिल जगधनी असून या उपक्रमात कर्मचारी काम करीत आहेत. उरण शहरात ज्या भागात कोरोना रुग्ण आढळले आहेत, अशा भागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन, कुणाला ताप, सर्दी, आजारी आहेत का, त्याचप्रमाणे कुटुंबातील सदस्य नावे, वय, यांची माहितीची नोंद करीत आहेत. अशा प्रकारची चौकशी करून, माहिती गोळा करीत आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे, अशी माहिती उरणनगरपरिषदचे नोडल अधिकारी अनिल जगधनी यांनी दिली.