Breaking News

भाजपतर्फे गरजूंना तांदळाचे वाटप

नवी मुंबई : प्रतिनिधी

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप महायुतीच्या केंद्र सरकारला 30 मे रोजी सात वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त सेवा हीच संघटना हा भाजपचा मूलमंत्र लक्षात घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात सेवाकार्य दिन साजरा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप नवी मुंबई युवा मोर्चा अध्यक्ष दत्ता घंगाळे, समाजसेविका अश्विनी घंगाळे यांच्या पुढाकाराने सीवूड्स प्रभाग क्रमांक 111 मध्ये गरजू नागरिकांना मोफत तांदूळ वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. गरजू नागरिकांना एकूण 2000 किलो तांदळाचे वाटप या सेवाकार्य दिनाच्या माध्यमातून  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग नियमावलीचे पालन करून होणार असल्याचे या वेळी दत्ता घंगाळे यांनी सांगितले.

Check Also

कामोठे येथे समाजोपयोगी वस्तूंच्या वाटपाचा उपक्रम

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून कौतुक कामोठे ः रामप्रहर वृत्तनेत्याची खरी ताकद ही त्याच्या कार्यकर्त्यांमध्ये असते. …

Leave a Reply