Breaking News

पनवेल तालुक्यात 251 नवीन कोरोना रुग्ण; चौघांचा मृत्यू; 156 जणांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल तालुक्यात बुधवारी

(दि. 15) कोरोनाचे 251 नवीन रुग्ण आढळले असून चौघांचा  मृत्यू  झाला आहे. तर 156 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाच्या बळींचे शतक पूर्ण झाले. बुधवारी 180 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून चौघांचा मृत्यू झाला आहे तर 121 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 71 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून 35 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात

आले आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात 180 नवीन रुग्ण आढळले. पनवेलमधील कच्छी मोहल्लाअल अमिन अपार्टमेंट, सन शाईन वसुंधरा अपार्टमेंट, खारघर सेक्टर 21 सम्राट अशोक सोसायटी आणि कामोठे सेक्टर 36 मधील  सूरज कॉम्प्लेक्समधील व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये कळंबोलीत 45 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 738 झाली आहे. कामोठेमध्ये 29 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 936 झाली आहे. खारघरमध्ये 40 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 853 झाली आहे. 

नवीन पनवेलमध्ये 16 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 679 झाली आहे. पनवेलमध्ये 40 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 882 झाली आहे.   तळोजामध्ये 10 नवीन रुग्ण आढळले तेथील रुग्णांची संख्या 247 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 4335 रुग्ण झाले असून 2751  रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 63.46 टक्के आहे. 1484  रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 100 जणांचा मृत्यू झाला आहे. पनवेल ग्रामीण भागात कोरोनाचे नवीन 71 रुग्ण आढळले असून 35 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

उरणमध्ये 10 जणांना लागण

उरण : वार्ताहर

उरण तालुक्यात बुधवारी कोरोनाचे 10 नवे रुग्ण आढळले असून 30 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आढळलेल्या रुग्णांमध्ये चिरनेर, विंधणे, बेलदारवाडा, रेल्वे कॉलनी, बोकडवीरा, जेएनपीटी टाऊनशीप, कोटनाका, द्रोणागिरी, पिरवाडी, उरण येथे प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तर बरे झालेल्या रुग्णांमध्ये उरण चार, दिघोडे तीन, टाकीगाव, गोवठणे, नवीन शेवा, वेश्वी येथे प्रत्येकी दोन, मुळेखंड, हनुमान कोळीवाडा, सोनारी, गावठाण, रांजणपाडा, चिर्ले, बोरी, पुनाडे, केगाव, डाऊरनगर, करंजा, विंधणे, बोकडवीरा, धुतूम, सावरखार येथे प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या  532  झाली आहे.

नवी मुंबईत 356 जण पॉझिटिव्ह;

278 रुग्ण कोरोनामुक्त

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबईत बुधवारी 356 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला.  त्यामुळे  कोरोना बधितांची एकूण संख्या  10 हजार 273 झाली आहे. तर 278 जण कोरोनामुक्त झाल्याने बरे झालेल्यांची एकूण संख्या सहा हजार 350 झाली आहे. बुधवारी आठ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 318 झाली आहे. 

नवी मुंबईत आतापर्यंत 27 हजार 249 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 16 हजार 414 जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. सद्यस्थितीत नवी मुंबईत तीन हजार 605 रुग्ण उपचार घेत आहेत. नवी मुंबईतील विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर 55, नेरुळ 93, वाशी 29, तुर्भे 33, कोपरखैरणे 47, घणसोली 48, ऐरोली 39 व दिघा 12 असा समावेश आहे.

कळंबोली येथे कोविड केंद्राची सुविधा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

सुअस्थ हॉस्पिटल हे 350 बेड्स असलेले मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स हेल्थकेअर नुकतेच कार्यरत झाले आहे आणि नवी मुंबईतील रहिवाशांसाठी या हॉस्पिटलची आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात

आली आहे.

या हॉस्पिटलची सुरक्षा व्यवस्था आंतरराष्ट्रीय दर्जांनुसार आहे, ज्याची डिझाईन डॉ. संजीव कनोरिया (एमआरसीएस, एमबीए, पीएचडी) यांनी तयार केलेली आहे. या हॉस्पिटलमध्ये अधिक रुग्ण भरती करण्याची आणि त्यांच्यावर उपचार करण्याची सुविधा आहे. हॉस्पिटलमध्ये रुग्णांना उत्तम सेवा दिली जाते. डॉ. संजीव कनोरिया हे युनायटेड किंगडममधील सुप्रसिद्ध हेल्थकेअर उद्योजक व लिव्हर ट्रान्सप्लाण्ट सर्जन आहेत. त्यांचे अनेक बहुमूल्य लेख व वैज्ञानिक संशोधन प्रकाशित करण्यात आले आहेत. या विभागातील कोविड केअर सुविधांची आत्यंतिक गरज लक्षात घेता, सुअस्थ हॉस्पिटलने वेगळे 100 बेडचे कोविड केअर

केंद्र सुरू केले आहे.

हे केंद्र हॉस्पिटलमधील इतर विभागांपासून वेगळे असून त्याचे प्रवेशद्वार देखील वेगळे आहे. पनवेल महानगरपालिकेने (पीएमसी) सांगितलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार हे केंद्र कार्यरत आहे. परिसराचे नियमित निर्जंतुकीकरण, सेफ्टीगिअर्स व पीपीईकिट्सचा वापर आणि आवश्यकतेनुसार कर्मचार्‍यांची तपासणी अशी योग्य ती काळजी घेतली जात आहे.

कर्जत तालुक्यात 18 नवीन रुग्ण

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार

कर्जत तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून गेल्या दोन दिवसांपासून कर्जत शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाची बाधा झालेले रुग्ण आढळू लागले आहेत. बुधवारी दोन बँक ऑफ इंडियाच्या कर्मचार्‍यांसह 18 रुग्ण आढळले असून आत्तापर्यंत तालुक्यातील कोरोना लागण झालेल्यांची संख्या 285 वर पोहचली असून 152 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

आढळलेल्या रुग्णांमध्ये शहरातील पाटील आळी या मूळ वस्तीत राहणारा 57 वर्षीय व 28 वर्षीय व्यक्ती, महावीर पेठेमध्ये राहणारा 53 वर्षीय व्यक्ती, विठ्ठल नगरमध्ये राहणारा 45 वर्षीय व 36 वर्षीय युवक, मुद्रे खुर्द भागातील नानामास्तर नगर मधील 53  वर्षीय महिला, कर्जत शहरातील 42, 64 वर्षीय व्यक्ती, 11 वर्षांचा मुलगा, कोतवाल नगरमध्ये वास्तव्यास असलेली 30 वर्षीय महिला, आठ वर्षांचा मुलगा, शहरातील गणेश अपार्टमेंटमध्ये राहणारा 50 वर्षीय व्यक्ती, किरवली गावातील 56 वर्षीय महिला, शहरातील दत्त मंदिर परिसरातील 35 वर्षीय व्यक्ती, नेरळ शहरातील गणेश नगरमध्ये राहणारा 37 वर्षीय तरुण, धामोतेमधील भवानी नगरमध्ये राहणारा 35 वर्षीय तरुण, दहीगाव येथील 54 वर्षीय व्यक्ती, नेरळमधील 35 वर्षांचा युवक यांचा समावेश आहे.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply