कर्जत : बातमीदार – मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक अर्थात बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये कर्जत तालुक्यातील तीन कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, तालुक्यातील शासकीय अनुदानित भालीवडी आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींनी कला आणि विज्ञान शाखेत 100 टक्के यश मिळवले आहे. या आश्रमशाळेत राहून निवासी शिक्षण घेणार्या सर्व 50 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत, अशी माहिती मुख्याध्यापिका एस. डी. भोई यांनी दिली. नेरळ येथील नेरळ विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला असून, तेथे परीक्षा देणारे सर्व 96 विद्यार्थी यशस्वी झाले आहेत, असे मुख्याध्यापक एम. डब्लू. विचवे यांनी सांगितले. कशेळे येथील भाऊसाहेब राऊत विद्यालयानेदेखील यश मिळविले आहे. तेथील विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला असल्याचे मुख्याध्यापक प्रधान यांनी सांगितले.
कर्जत शहरातील अभिनव ज्ञानमंदिर कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान शाखेत 165 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 163 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्याची टक्केवारी 98.78 इतकी आहे. वाणिज्य शाखेत 399 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती आणि त्यात 386 विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. कला शाखेत 153 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 120 विद्यार्थी पास झाले असून, त्याची टक्केवारी 78.43 एवढी आहे. एमसीव्हीसी या शाखेत 28 पैकी 26 विद्यार्थ्यांनी यश मिळविले असून, त्यांची सरासरी टक्केवारी 92.85 इतकी आहे. तालुक्यातील चिंचवली डिक्सळ येथील भाऊसाहेब राऊत कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कला शाखेत 43 विद्यार्थ्यांपैकी 41 विद्यार्थ्यांनी यश मिळविले असून, त्यांची टक्केवारी 95.34 टक्के इतकी आहे.
पेण तालुक्याचा 90.80% निकाल
पेण : प्रतिनिधी – बारावी परीक्षेत पेण तालुक्याचा निकाल 90.80 टक्के लागला आहे. तालुक्यातून 1719 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 1561 उत्तीर्ण झाले आहेत.
पेण प्रायव्हेट हायस्कूलच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान तिन्ही शाखांचा एकत्रित निकाल 94.06 टक्के लागला आहे. सार्वजनिक विद्यामंदिरच्या ज्युनिअर कॉलेजचा तिन्ही शाखांचा सरासरी निकाल 92.77 टक्के आहे. न्यू इंग्लिश स्कूल जोहे प्रशालेचा विज्ञान व कला दोन्ही शाखांचा एकत्रित निकाल सरासरी 92.56 टक्के इतका आहे. जय किसान विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज वडखळ कला शाखेचा निकाल 77.19 टक्के इतका आहे. सुधागड एज्युकेशन दादर ज्युनिअर कॉलेजच्या कला शाखेचा निकाल 82.92 टक्के लागला.
वरसई आश्रमशाळेचा कला शाखेचा निकाल 94.28 टक्के आहे. एमसीव्हीसी प्रशालेचा 82.05 टक्के, तर ज्युनिअर कॉलेजचा 61.33 टक्के निकाल लागला आहे.
माणगावच्या निकम कॉलेजचे धवल यश
माणगाव : प्रतिनिधी – माणगाव एज्युकेशन ट्रस्ट संचालित एस. एस. निकम इंग्लिश स्कूल अॅण्ड ज्युनिअर सायन्स कॉलेजचा बारावी परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे. 35 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. हे सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
कॉलेजमधून तनुजा समेळ (76.62 टक्के) प्रथम, शुभम पालकर (76.15 टक्के) द्वितीय, तर अभिजीत सायगावकर (72 टक्के) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. मदन निकम, पदाधिकारी व सदस्य, स्कूल कमिटी चेअरमन अॅड. प्रकाश ओक, प्राचार्य सतीक्ष बडगुजर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रा. शरद मोरे, शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
कै. जैन महाविद्यालय, नागोठणे
नागोठणे : प्रतिनिधी – बारावीच्या परीक्षेत कोएसोच्या नागोठणे येथील कै. सरेमल प्रतापमल जैन कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 95. 44 टक्के इतका लागला असून, विज्ञान शाखेचा सलमान जुबेर अधिकारी हा विद्यार्थी 86.92 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आला. 351 पैकी 335 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेत 159 पैकी 157 (98.74 टक्के), वाणिज्य शाखेत 110 पैकी 101 (91.81 टक्के), तर कला शाखेत 82 पैकी 77 (93.90 टक्के ) उत्तीर्ण झाले.
प्रथम तीन क्रमांकांनी उत्तीर्ण विद्यार्थी
विज्ञान शाखा : सलमान जुबेर अधिकारी 86.92 टक्के (प्रथम), संयुजा टिळक खाडे 85.38 टक्के (द्वितीय), सिद्धी दयाराम गिजे 78.15 टक्के (तृतीय); वाणिज्य शाखा : हर्ष गणेश जाधव 78.46 टक्के (प्रथम), मयुरी दीपक मढवी 76.61 टक्के (द्वितीय) ओम बबन कदम 72. 77 टक्के (तृतीय); कला शाखा : भक्ती चंद्रकांत कुथे 76.30 टक्के (प्रथम), आकांक्षा परशुराम मोकल 76.69 टक्के (द्वितीय), वैभव यल्लप्पा तलगीरे 69.38 टक्के (तृतीय).
जिंदल माऊंट लिटेरा झी स्कूल, रोहे
रोहे : प्रतिनिधी – जिंदल माऊंट लिटेरा झी स्कूलचा 100 टक्के लागला आहे. या विद्यालयात विज्ञान शाखेत अवंती थळे (84.6 टक्के) हिने प्रथम, दीपशिखा सिंगने (87.2 टक्के) द्वितीय, तर खुशी पांडेने (60.4 टक्के) तृतीय क्रमांक पटकाविला. वाणिज्य शाखेत प्रथम दीपांजन करमाकरने (87.2 टक्के) प्रथम, शिवानी नेगी (66.2 टक्के) द्वितीय, सौरव सिंग (67 टक्के) तृतीय क्रमांक प्राप्त केला. प्राचार्य सविता शर्मा यांनी यशस्वी विद्यार्थी, पालक व शिक्षकवृंदाचे अभिनंदन केले.
वरसगाव, सुडकोली उच्च माध्यमिक विद्यालयांचे यश
रोहे : प्रतिनिधी – कोलाड विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्रीमती गीता द. तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वरसगाव आणि श्रीमती गीता द. तटकरे ज्युनिअर कॉलेज सुडकोली या दोन्ही उच्च माध्यमिक विद्यालयांनी आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा यंदाही अबाधित राखली आहे. बारावीच्या परीक्षेत वरसगाव विद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल 93.64 % आणि वाणिज्य शाखेचा 96.66%, तर सुडकोली विद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा निकाल 86.79% लागला आहे.
प्रतिकूल परिस्थितीतून आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची चुणूक दाखवणार्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष संदीप तटकरे, सचिव प्रकाश सर्कले, मुख्याध्यापक श्रीमती पाटील, अजित तेलंगे यांनी कौतुक केले.
माणगाव ज्युनिअर कॉलेज
माणगाव : प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळातर्फे फेब्रुवारी 2020मध्ये घेण्यात आलेल्या बारावी प्रमाणपत्र परीक्षेत माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या ज्युनिअर कॉलेजचा निकाल 95.28 टक्के लागला आहे.
माणगाव ज्युनिअर कॉलेजमध्ये विज्ञान शाखेतून एकूण 204 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. यापैकी 202 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेतसंजना संतोष शिगवण (87.23 टक्के) प्रथम, पूजा प्रदीप देवकर (85.23 टक्के) द्वितीय आणि गितेश सुधीर बोंडे (82.15 टक्के) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला. वाणिज्य शाखेतून एकूण 211 पैकी 198 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेत अर्चना सीताराम वाढवळ (84 टक्के) प्रथम, नंदिनी ज्ञानेश्वर डोंगरे (78.03 टक्के) द्वितीय आणि सुचिता चंद्रकांत निकम (72 टक्के) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. कला शाखेमधून एकूण 214 पैकी 199 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेमधून दिव्या बळीराम पाटील (85.38 टक्के) प्रथम, काजल दशरथ देवकर (79.38 टक्के) द्वितीय आणि वृषाली बाबू साळवी (68.76 टक्के) तृतीय आली.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अॅड. राजीव साबळे, पदाधिकारी व सदस्य, स्कूल कमिटी चेअरमन राजन मेथा, मुख्याध्यापक डी. एम. जाधव, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.