Breaking News

आपापसात मारामार्‍या करा, पण लोकांचा विचार करा!

देवेंद्र फडणवीस  यांचा महाविकास आघाडीला टोला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महा जॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून काँग्रेसने शिवसेना-राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त केली होती. हा धागा पकडत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, आपापसात मारामार्‍या करा, पण लोकांचा विचार करा, असा टोला महाविकास आघाडीला लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी साखर उद्योगासंदर्भातील प्रश्नांसंदर्भात केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन या विषयी माहिती दिली. त्याचबरोबर राज्यातील राजकीय घडामोडींवरही भाष्य केले. शरद पवारासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, पवार त्यांचे काम करतात, आम्ही आमचे काम करतोय. अशी काही स्पर्धा नाहीये की त्यांनी काय केले म्हणून आम्ही करायचे आणि आम्ही काय केले म्हणून त्यांनी काय करायचे. सध्या साखर उद्योगाकडे लक्ष देण्याची गरज आहे. केंद्रात आमचे सरकार आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडे आम्ही मागणी घेऊन जाणे अपेक्षितच आहे. म्हणून आम्ही आलो आहोत.
महा जॉब्स पोर्टलसंदर्भातील जाहिरातीवरून काँग्रेसने नाराजी जाहीर केली होती. त्याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले, आमचे म्हणणे एवढेच आहे की, फोटो कुणाचेही छापा, पण तुम्ही ज्या मोठ-मोठ्या घोषणा केल्या आहेत. इतक्या लोकांना रोजगार देऊ, इतक्या लोकांना नोकर्‍या मिळेल. इतक्या कंपन्या येतील त्या संदर्भात काहीतरी कार्यवाही करा. बाकी तुम्हाला ज्याचे फोटो छापायचे आहेत आणि ज्यांचे चेहरे दाखवायचे आहेत त्यांचे दाखवा. आपापसात मारामार्‍या करा, काहीही करा, फक्त लोकांना फायदा झाला पाहिजे असा विचार करा.
ठाकरे सरकार पाडण्यात रस नाही!
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ‘ही भेट राजकीय नव्हती. आम्हाला राज्यातील ठाकरे सरकार पाडण्यात काहीही कुठलाही रस नाही’, असे प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी स्पष्ट केले. आता कोरोनाची लढाई सुरू आहे. त्यामुळे कोरोनाच्यासंदर्भात आणि शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी ही भेट होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळाल्यास त्यांनाही महाराष्ट्रातील परिस्थितीविषयी अवगत करणार आहे, असेही ते म्हणाले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply