पनवेल गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई
पनवेल : वार्ताहर – सुमारे 700 किलो लोखंडी पाइप व त्याचे तुकडे असे भंगार पिकअप टेंपोत भरून जबरीने चोरून नेणार्या दोघांना गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-2 (पनवेल)च्या पथकाने गजाआड केले आहे.
उरण येथील डॉल्फिन कास्टिंग यार्ड या कंपनीच्या प्रवेशद्वारावर असलेल्या सुरक्षारक्षकाला आरोपींनी शिवीगाळ करून व धमकावून यार्डमधील अंदाजे 700 किलो लोखंडी पाइप व त्याचे तुकडे अशा भंगार पिकअप टेंपोत भरून जबरीने चोरून ते पसार झाले होते. याबाबतची तक्रार उरण पोलीस ठाण्यात करताच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपायुक्त पाटील, सहाय्यक आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पनवेल शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या सहकार्याने सहाय्यक निरीक्षक गणेश कराड, हवालदार रणजित पाटील, शिपाई सम्राट डाकी यांच्या पथकाने
आरोपींचा शोध घेत घेतला.
या आरोपींची माहिती पथकाला मिळताच त्यांनी प्रकाश पाटील (वय 42, रा. मानघर), सुजित पाटील (वय 37, रा. पटनोली) या दोघांना ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता, या आरोपींनी गुन्ह्याची कबूली दिली. अवघ्या 24 तासांत आरोपींना गजाआड करण्यात गुन्हे प्रकटीकरण पनवेल शाखेच्या पथकाला यश आले आहे.