Breaking News

पनवेल तालुक्यात 183 जण पॉझिटिव्ह

तिघांचा मृत्यू; 222 रुग्णांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात शनिवारी  (दि. 18) कोरोनाचे 183 नवीन रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू  झाला आहे तर 222 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत पुन्हा विक्रमी वाढ झाली आहे. दिवसभरात 125  नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर 161  रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 58 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून 61 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात 125  नवीन रुग्ण आढळले. नवीन पनवेल पोदी नं. 2 आनंद मंगल सोसायटी व कामोठे सेक्टर 10 अलंकापुरी सोसायटीतील दोघांचा मृत्यू झाला. आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 24 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 806 झाली आहे. कामोठेमध्ये 28 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1000 झाली आहे. खारघरमध्ये 17 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 929  झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 34 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 774 झाली आहे. पनवेलमध्ये 22 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 961 झाली आहे. तळोजामध्ये एकही नवीन रुग्ण न आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 269 आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 4739 रुग्ण झाले असून 3235 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 68.26 टक्के आहे. 1394 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 110 जणांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल ग्रामीणमध्ये पोसरी येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर आढळलेल्या रुग्णांत उलवे 12, गव्हाण सात, सुकापूर सहा, करंजाडे चार, नेरे चार, कोळखे तीन, डेरवली, विचुंबे, नेवाळी येथे प्रत्येकी दोन, आदई, बोर्ले, देवद, कोप्रोली, मोहा, उसर्ली, दापोली, ओवळे, न्हावा, आंबिवली, जांभिवली, वडघर, वलप, आपटा, जाताडे, पारगाव येथे प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत ग्रामीण भागात 1519रुग्ण झाले असून 1008 जणांनी कोरोनावर मात केली असून 31 जणांचा मृत्यू झाला आहे.

उरण तालुक्यात आढळले 29 रुग्ण; 44 जणांना डिस्चार्ज

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी – उरण तालुक्यात शनिवारी 29 कोरोनागस्त आढळले असून, 44 रुग्ण कोरोनामुक्त आहे. आढळलेल्या रुग्णांत जेएनपीटी तीन, बोकडवीरा, खोपटे, दिघोडे, आवरे, जासई, सावरखार येथे प्रत्येकी दोन, तसेच घोसपाडा, न्हावा-शेवा, करंजा रोड, ओएनजीसी सीआएसएफ, चीर्ले, पाणजे, मोरा गणपती मंदिर, उरण पोलीस स्टेशन, म्हातवली, द्रोणागिरी, मुळेखंड, करंजा, सोनारी, नागाव येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तालुक्यातील रुग्णांची संख्या 609 झाली आहे. 434  बरे झाले आहे. फक्त 158 रुग्ण उपचार घेत आहेत व आतापर्यंत 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी महिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

महाडमध्ये सहा रुग्णांची वाढ

महाड : महाडमध्ये शनिवारी सहा कोरोना रुग्णांची नोंद झाली तर पाच रुग्ण पुर्ण बरे झाले आहेत, एकाचा मृत्यू झाला आहे. आढळलेल्या रुग्णांत बिरवाडी दोन पुरुष, नडगाव तर्फे बिरवाडी दोन पुरुष, महाड शहर, पानसार मोहल्ला येथे प्रत्येकी एका पुरुषाचा समावेश आहे. आतापर्यंत 155 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

मोहोपाडा हद्दीत सहा नवे रुग्ण

मोहोपाडा : वासांबे (मोहोपाडा) परीसरात शनिवारी सहा जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून वासांबे हद्दीत एकूण 155 व्यक्ती कोरोनाबाधित झाले आहेत. त्यातील आजपर्यंत जवळपास 104 जणांनी कोरोनावर मात करुन घरी सुखरूप आहेत. शनिवार आढळलेल्या रुग्णांत नवीन पोसरी तीन, रिस नवीन वसाहत तीन असे सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनाला घाबरून जाऊ नये, स्वत:ची रोगप्रतिकारशक्ती वाढवा, कोरोना आपोआप गायब होईल. यासाठी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत, चांभार्ली, वावेघर व नजिकच्या ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व कर्मचारी, सर्वपक्षीय पदाधिकारी तसेच पोलीस यंत्रणा प्रयत्नशील असल्याचे दिसून येते.

नवी मुंबईत 352 जण कोरोनाग्रस्त

नवी मुंबई : नवी मुंबईत शनिवारी 352 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कोरोना बधितांची एकूण संख्या  11 हजार 138 झाली आहे. तर 256 जण कोरोनामुक्त झाले आहे. शनिवारी 10 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 340 झाली आहे.  नवी मुंबईत आतापर्यंत 28 हजार 859 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 17  हजार 342 जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. सद्य स्थितीत नवी मुंबईत 3 हजार 810 रुग्ण उपचार घेत आहेत. आढळलेल्या रुग्णांची विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर 39, नेरुळ 67, वाशी 36, तुर्भे 34, कोपरखैरणे 67, घणसोली 40, ऐरोली 66 व दिघा 3 असा समावेश आहे.

कर्जत तालुक्यात नऊ जणांना लागण

कर्जत : कर्जत तालुक्यात शनिवारी नऊ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून त्यामध्ये एका पोलीस कर्मचार्‍याचा समावेश आहे. आत्तापर्यंत तालुक्यातील रुग्णांची संख्या 324 झाली आहे. त्यापैकी 212 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आढळलेल्या रुग्णांत नेरळमधील 32 वर्षीय तरुण, वदप येथील 45 वर्षीय व्यक्ती, कडाव येथील 27 वर्षीय तरुण, दत्तमंदिर जवळील एका इमारतीतील 45 वर्षीय महिला,13 वर्षीय मुलगी, 24 वर्षीय मुलगा, कर्जत रेल्वे स्थानकानजीकच्या तुलसी अंगन इमारतीतील 45 वर्षीय व्यक्ती, मुद्रे बुद्रुक गावातील 27 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply